वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार 

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. यात अकोला-वाशीम-बुलडाणा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. यासाठी १० डिसेंबरला मतदान होत असून, आचारसंहिता लागू झाली आहे.
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार 
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार 

अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. यात अकोला-वाशीम-बुलडाणा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. यासाठी १० डिसेंबरला मतदान होत असून, आचारसंहिता लागू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत या मतदारसंघात होण्याचीच दाट शक्यता आहे. विद्यमान शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरुद्ध भाजपचा कोण उमेदवार रिंगणात उतरतो यावरही बरेच काही अवलंबून आहे. 

आ. बाजोरिया यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे. त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक घेतली जात आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांतील जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सभापती हे या निवडणुकीचे मतदार आहेत. यापूर्वी सन २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७९० मतदार होते. अकोला येथील शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांनी तेव्हा विजयाची ‘हॅटट्रिक’ साजरी केली होती. त्या वेळी त्यांच्यासोबत भाजप होते. बाजोरिया यांनी तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. आता शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे बाजोरिया यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ अपेक्षित मानली जात आहे. 

दुसरीकडे भाजप या वेळी आता स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे यंदाची निवडणुक ही चुरशीची होऊ शकते. कारण गेल्या वेळी एकाच गटात असलेले दोन पक्ष या वेळी समोरासमोर उभे राहू शकतात. या मतदारसंघात बाजोरिया यांनी तीन टर्मपासून पकड बनवलेली आहे. त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर मुलालासुद्धा परभणीतून गेल्या वेळी निवडून आणण्याचे आव्हान पेलले. मुलगा विप्लव हा विधान परिषदेत निवडून आला. 

त्यांचा मतदारांपर्यंत असलेला थेट संपर्क, सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींसोबत असलेले संबंध प्रत्येक वेळी मदतीला धाऊन आलेले आहेत. यंदा चित्र कसे राहील हे पुढील काळात स्पष्ट होईल. भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाते यावरही लढतीचे चित्र अवलंबून आहे. तर महाविकास आघाडी एकत्र असल्याने राष्ट्रवादीला ही जागा शिवसेनेला सोडावी लागेल. भाजपकडून बुलडाणा जिल्ह्यातील माजी आमदार चैनसुख संचेती यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय अकोल्यातील वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, शेगाव येथील शरद अग्रवाल, वाशीम जिल्ह्यातील विजय जाधव यांचीही नावे चर्चेत आहेत. 

दृष्टिक्षेपात मतदारसंघ 

  • अकोला जिल्हा ः एक महानगरपालिका, पाच नगर परिषद, एक नगर पंचायत, सात पंचायत समिती सभापती 
  • बुलडाणा जिल्हा ः ११ नगर परिषद, दोन नगर पंचायत, १३ पंचायत समिती सभापती 
  • वाशीम जिल्हा ः चार नगर परिषद, दोन नगर पंचायत, सहा पंचायत समिती सभापती 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com