agriculture news in marathi Legislative Council Election varhad | Page 2 ||| Agrowon

वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. यात अकोला-वाशीम-बुलडाणा या स्थानिक स्वराज्य संस्था
मतदारसंघाचा समावेश आहे. यासाठी १० डिसेंबरला मतदान होत असून, आचारसंहिता लागू झाली आहे.

अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. यात अकोला-वाशीम-बुलडाणा या स्थानिक स्वराज्य संस्था
मतदारसंघाचा समावेश आहे. यासाठी १० डिसेंबरला मतदान होत असून, आचारसंहिता लागू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत या मतदारसंघात होण्याचीच दाट शक्यता आहे. विद्यमान शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरुद्ध भाजपचा कोण उमेदवार रिंगणात उतरतो यावरही बरेच काही अवलंबून आहे. 

आ. बाजोरिया यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे. त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक घेतली जात आहे. अकोला, वाशीम,
बुलडाणा या जिल्ह्यांतील जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सभापती हे या निवडणुकीचे
मतदार आहेत. यापूर्वी सन २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७९० मतदार होते. अकोला येथील शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांनी तेव्हा विजयाची
‘हॅटट्रिक’ साजरी केली होती. त्या वेळी त्यांच्यासोबत भाजप होते. बाजोरिया यांनी तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. आता शिवसेना
महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे बाजोरिया यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ अपेक्षित मानली जात आहे. 

दुसरीकडे भाजप या वेळी आता स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे यंदाची निवडणुक ही चुरशीची होऊ शकते. कारण गेल्या वेळी एकाच गटात
असलेले दोन पक्ष या वेळी समोरासमोर उभे राहू शकतात. या मतदारसंघात बाजोरिया यांनी तीन टर्मपासून पकड बनवलेली आहे. त्यांनी आपल्या अनुभवाच्या
जोरावर मुलालासुद्धा परभणीतून गेल्या वेळी निवडून आणण्याचे आव्हान पेलले. मुलगा विप्लव हा विधान परिषदेत निवडून आला. 

त्यांचा मतदारांपर्यंत असलेला थेट संपर्क, सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींसोबत असलेले संबंध प्रत्येक वेळी मदतीला धाऊन आलेले आहेत. यंदा चित्र कसे राहील हे
पुढील काळात स्पष्ट होईल. भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाते यावरही लढतीचे चित्र अवलंबून आहे. तर महाविकास आघाडी एकत्र असल्याने राष्ट्रवादीला
ही जागा शिवसेनेला सोडावी लागेल. भाजपकडून बुलडाणा जिल्ह्यातील माजी आमदार चैनसुख संचेती यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय अकोल्यातील वसंत
खंडेलवाल, विजय अग्रवाल, शेगाव येथील शरद अग्रवाल, वाशीम जिल्ह्यातील विजय जाधव यांचीही नावे चर्चेत आहेत. 

दृष्टिक्षेपात मतदारसंघ 

  • अकोला जिल्हा ः एक महानगरपालिका, पाच नगर परिषद, एक नगर पंचायत, सात पंचायत समिती सभापती 
  • बुलडाणा जिल्हा ः ११ नगर परिषद, दोन नगर पंचायत, १३ पंचायत समिती सभापती 
  • वाशीम जिल्हा ः चार नगर परिषद, दोन नगर पंचायत, सहा पंचायत समिती सभापती 

इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...