विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आघाडी आणि भाजपात सामना

Legislative Council two seats for match between Mahavikas Aghghadi and Bjp
Legislative Council two seats for match between Mahavikas Aghghadi and Bjp

मुंबई ः विधान परिषदेचे दोन सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने या दोन जागांसाठी आता निवडणूक होत असून त्यांपैकी एका जागेचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय दौंड यांनी दाखल केला.

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत विधानसभेत निवडून गेल्याने या दोघांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या जागी बीडमधील राष्ट्रवादीचे नेते संजय दौंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंडे यांची रिक्‍त झालेली जागा विधानसभा सदस्यातून निवडून द्यावयाची आहे. 

या जागेसाठी भाजपने राजन तेली यांना मैदानात उतरविले आहे. सध्या विधानसभेत भाजपचे १०५ तर महाविकास आघाडीचे १६२ आमदार आहेत. काही अपक्ष आमदारांनीही आघाडीच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला असल्याने दौंड सहजपणे निवडून येऊ शकतात. त्यामुळे राजन तेली निवडणुकीच्या मैदानात शेवटपर्यंत राहतात की उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तानाजी सावंत यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आले होते. सावंत आता ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. आता त्यांच्या जागी दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

महाविकास आघाडीकडून आज दुष्यंत चतुर्वेदी उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यापूर्वी माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सतीश चतुर्वेदी, कॉंग्रेस नेते नितीन राऊत, शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड बैठकीत उपस्थित होते. दुष्यंत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. दुष्यंत चतुर्वेदी हे कॉंग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com