Agriculture news in Marathi Lentil crop demonstration on Wednesday at Latur | Agrowon

लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिक

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जानेवारी 2021

लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र येथे बुधवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता जवस दिनानिमित्त पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिली.

परभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र येथे बुधवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता जवस दिनानिमित्त पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत लातूर ये‍थील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र आणि हैदराबाद येथील तेलबिया संशोधनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी राहणार आहेत. हैदराबाद येथील शास्‍त्रज्ञ डॉ. एस. एन. सुधाकरबाबू यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन होणार आहे.संशोधक संचालक डॉ. वासकर, हैदराबाद येथील जवस प्रकल्‍पाचे शास्‍त्रज्ञ डॉ. ए. एल. रत्‍नकुमार, मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ. संजय जांभूळकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या वेळी जवस पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्‍यात आले असून, संशोधन केंद्राच्‍या १५ एकर प्रक्षेत्रावर ९० दिवसांत तयार होणारे विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन वाण लातूर ९३ आणि इतर ४० वाणांचे पीक प्रात्‍यक्षिक पाहता येणार आहे. कृषिदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले असून, यात जवसाचे मूल्यवर्धित पदार्थ, जवस तेल, जवस चिक्की, जवस चटणी, जवस प्रतवारी, पॅकेजिंग आदींचा समावेश राहणार आहे. बचत गट सदस्‍यांना जवस लागवड, प्रक्रिया, मूल्यवर्धन यावर प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. तांत्रिक सत्रात तीळ मूल्यवर्धन यावर डॉ. जांभूळकर, तेलबिया संशोधन व पुढील वाटचाल यावर डॉ. वासकर, सूर्यफूल लागवडीवर डॉ. सुधाकरबाबू, जवस लागवडीवर डॉ. रत्‍नकुमार, जवस मूल्यवर्धन यावर उदय देवळाणकर, जवस पिकावर शेतकरी अशोक चिंते हे मार्गदर्शन करणार आहेत.

 


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...