Agriculture news in marathi Leopard attacks a woman at the foot of Bhagwangada | Agrowon

भगवानगडाच्या पायथ्याला बिबट्याचा महिलेवर हल्ला

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भगवानगड लमाणतांड्यावरील महिलेवर बिबट्याने शनिवारी हल्ला केला. दोन्ही पायांनी अधू असलेले पती मदतीला धावल्याने महिलेचे प्राण वाचले. 

नगर  : पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भगवानगड लमाणतांड्यावरील महिलेवर बिबट्याने शनिवारी हल्ला केला. दोन्ही पायांनी अधू असलेले पती मदतीला धावल्याने महिलेचे प्राण वाचले. दिव्यांग पतीने हातातील काठीने त्यांनी बिबट्याचा प्रतिकार सुरूच ठेवल्याने बिबट्याला माघार घेत तेथून पळ काढावा लागला. 

वन विभागाने आतापर्यंत तीन बिबट्याला पकडले असतानाही पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगडाच्या परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता. मात्र, त्यावेळी दुर्लक्ष झाले. शनिवारी (ता. २१) गडाच्या पायथ्याशी असलेल्या तांड्यावरील छबूबाई राठोड (वय ४५) व दिव्यांग पती एकनाथ राठोड डोंगरालगतच्या शेतात काम करीत होते.

सायंकाळी चारच्या सुमारास बिबट्याने छबूबाई यांच्यावर अचानक झडप घातली. या प्रकाराने गांगरलेल्या छबूबाई यांनी जोरजोरात आरडाओरडा केला. बिबट्याने तोंडावर पंजा मारल्याने छबूबाई गंभीर जखमी झाल्या. जवळच असलेले दिव्यांग पती एकनाथ राठोड हातात काठी घेत मदतीसाठी धावले. काठीने त्यांनी बिबट्याला प्रतिकार सुरू केला. अखेर बिबट्याने माघार घेतली. 

गंभीर जखमी अवस्थेत छबूबाई यांना खरवंडी येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. वनाधिकाऱ्यांनी सायंकाळी घटनास्थळाची पाहणी केली. छबूबाई राठोड यांचे पती एकनाथ हे दोन्ही पायांनी अधू आहेत. चालण्यासाठी त्यांना काठीचा आधार घ्यावा लागतो. तीच काठी आज पत्नीचे प्राण वाचविताना मदतीला आली. दिव्यांग असतानाही पत्नीचे रक्षण करणाऱ्या एकनाथ राठोड यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले. मात्र बिबट्याच्या भीतीने शेतकरी पुरते धास्तावले आहेत.


इतर बातम्या
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...