मोहोळ, उत्तर सोलापुरात बिबट्याची दहशत कायम

चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी, कोंडी (ता. उत्तर सोलापूर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे.
Leopard terror persists in Mohol, North Solapur
Leopard terror persists in Mohol, North Solapur

सोलापूर ः चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी, कोंडी (ता. उत्तर सोलापूर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी या परिसराची पाहणी करून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी, अशी सूचना केली. 

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत या भागात वाढली आहे. २७ जुलैला पहिल्यांदा बिबट्या कोंडी परिसरात आढळला. एका कामगाराने त्याला पाहिले. त्या वेळी वनविभागाच्या पथकाने त्या ठिकाणच्या त्याच्या वावराची पाहणी केली. त्याच्या पायांचे ठसे तपासले. तेव्हा ते बिबट्याचेच असल्याचेच स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून वनविभागाच्या पथकाकडून या ठिकाणी गस्त घालण्यात येत आहे. या भागातील पाणवठ्यावर कॅमेरेही लावण्यात आले आहेत. या भागातून शेतमजूर आणि कामगारांची सातत्याने ये-जा सुरू असते. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाय या गावातील लोकही शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. २) आमदार विजयकुमार देशमुख यांनी कोंडी परिसराला भेट दिली. या वेळी त्यांनी वनविभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. 

या वेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, अतिरिक्त वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार, शंकर कुताटे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नीळ, उद्योजक संजय पवार, सुरेश राठोड आदी उपस्थित होते. या वेळी आमदार देशमुख यांनी लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी वनविभागाने तज्ज्ञांची मदत घेऊन बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, अशी सूचना केली.

शिरापूरमध्ये वासरावर हल्ला शिरापूर येथे दिग्विजय ताकमोगे यांच्या वासरावर मंगळवारी (ता. ३) पहाटे हल्ला झाला. त्यात वासरू ठार झाले. पण हा हल्ला बिबट्याने केला की बिबट्यासदृश प्राण्याने, याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर याच भागात असल्याने त्याबाबत शंका वाढली आहे. वनविभाग त्यासंबंधी शोध घेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com