Agriculture news in Marathi Leopard terror persists in Mohol, North Solapur | Agrowon

मोहोळ, उत्तर सोलापुरात बिबट्याची दहशत कायम

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी, कोंडी (ता. उत्तर सोलापूर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे.

सोलापूर ः चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी, कोंडी (ता. उत्तर सोलापूर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी या परिसराची पाहणी करून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी, अशी सूचना केली. 

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत या भागात वाढली आहे. २७ जुलैला पहिल्यांदा बिबट्या कोंडी परिसरात आढळला. एका कामगाराने त्याला पाहिले. त्या वेळी वनविभागाच्या पथकाने त्या ठिकाणच्या त्याच्या वावराची पाहणी केली. त्याच्या पायांचे ठसे तपासले. तेव्हा ते बिबट्याचेच असल्याचेच स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून वनविभागाच्या पथकाकडून या ठिकाणी गस्त घालण्यात येत आहे. या भागातील पाणवठ्यावर कॅमेरेही लावण्यात आले आहेत. या भागातून शेतमजूर आणि कामगारांची सातत्याने ये-जा सुरू असते. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाय या गावातील लोकही शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. २) आमदार विजयकुमार देशमुख यांनी कोंडी परिसराला भेट दिली. या वेळी त्यांनी वनविभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. 

या वेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, अतिरिक्त वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार, शंकर कुताटे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नीळ, उद्योजक संजय पवार, सुरेश राठोड आदी उपस्थित होते. या वेळी आमदार देशमुख यांनी लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी वनविभागाने तज्ज्ञांची मदत घेऊन बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, अशी सूचना केली.

शिरापूरमध्ये वासरावर हल्ला
शिरापूर येथे दिग्विजय ताकमोगे यांच्या वासरावर मंगळवारी (ता. ३) पहाटे हल्ला झाला. त्यात वासरू ठार झाले. पण हा हल्ला बिबट्याने केला की बिबट्यासदृश प्राण्याने, याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर याच भागात असल्याने त्याबाबत शंका वाढली आहे. वनविभाग त्यासंबंधी शोध घेत आहे.


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...