नांदेड, परभणी, हिंगोलीत जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोलीत जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोलीत जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत जुलै महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली नाही. या तीन जिल्ह्यांतील ९४ मंडळांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात आजवर अपेक्षित पावसापेक्षा कमी झाला. जुलै महिन्यात या तीन जिल्ह्यांतील २० मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. तीन जिल्ह्यांतील ३० पैकी १६ तालुक्यांत अपेक्षित झाला नाही.

नांदेड जिल्ह्याची जुलै महिन्यातील पावसाची सरासरी २७३.९ मिमी आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात १६२.९ मिमी (५९.५ टक्के) पाऊस झाला आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. जुलै महिन्यात ८० मंडळांपैकी १२ मंडळांमध्ये १५ ते ३० टक्के पाऊस झाला. यामध्ये बिलोली (२४.६ मिमी), कुंडलवाडी (२७.१), जांब (२२.९), बाऱ्हाली (२७.१), बारुळ (२९), देगलूर (२३), खानापूर (२४.२), मरखेल (१६.८), मालेगाव (१६.४), हानेगाव (२३.४), नरसी (२३.९), मांजरम (२९.२) मंडळाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात ४४६.७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात ४०७ मिलिमीटर (९१.१ टक्के) पाऊस झाला. ४६ मंडळामध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही.

परभणी जिल्ह्याची जुलै महिन्यातील पावसाची सरासरी २१०.८ मिलिमीटर आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात १०८.८ मिलिमीटर (५१.६ टक्के) पाऊस झाला. जुलै महिन्यात ३९ पैकी ७ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यामध्ये माखणी (२७.१ मिमी), राणीसावरगाव (२९.२), आडगाव (२५.८), चाटोरी (२७.१), बनवस (२१.९), देऊळगाव (२५.८), आवलगाव (२५.५) मंडळांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात ३४४ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात २८१.१ मिलिमीटर (८१.७) टक्के) पाऊस झाला. ३३ मंडळांमध्ये आजवर अपेक्षित पावसापेक्षा कमी पाऊस झाला.

परभणी (७३.१ टक्के), गंगाखेड (८०.२ टक्के), पाथरी (५७.८ टक्के), जिंतूर (६८.६ टक्के), पालम (७५.३ टक्के), सेलू (७०.३ टक्के), सोनपेठ (७७.३ टक्के), मानवत (८३.२ टक्के) या आठ तालुक्यांत अपेक्षित पाऊस झाला नाही. हिंगोली जिल्ह्याची जुलै महिन्याची पावसाची सरासरी २४३.७ मिलिमीटर आहे; परंतु यंदा प्रत्यक्षात १९९.५ मिलिमीटर (७७.१ टक्के) पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com