कुक्‍कुटपालनची मागणी हजारात, मिळणार शेकड्यात

कुक्‍कुटपालनची मागणी हजारात, मिळणार शेकड्यात
कुक्‍कुटपालनची मागणी हजारात, मिळणार शेकड्यात

नगर : ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणाऱ्या कुक्कुटपालन योजनेतून यंदा राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ७८८ लाभार्थ्यांना कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. मात्र मागणीच्या तुलनेत हा अकडा नगण्य आहे. विशेष म्हणजे यंदा अंर्थसंकल्पीय तरतुदीच्या रकमेतून तीस टक्के रक्कम कमी करून लाभ दिला जात असल्याने लाभार्थ्यांची संख्याही साडेतीनशेने कमी झाली आहे. सध्या या योजनेसाठी राज्याला दहा कोटी ४८ लाख ९५ हजार रुपये उपलब्ध झाले आहेत. राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून कुक्कुटपालन करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून अनुदानाचा लाभ दिला जातो. अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण, तेहतीस टक्के महिला अशी वर्गवारी करून लाभार्थी निवडले जातात. एक हजार कुक्कुटपक्षी पालनासाठी ही योजना आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला योजनेतील रकमेच्या पन्नास टक्के, तर राखील प्रवर्गातील लाभार्थ्याला योजनेतील रकमेच्या ७५ टक्के अनुदान सरकार देते. गेल्या काही वर्षांपासून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र शासन त्यासाठी फारसा निधी तरतूद करत नसल्याचे सातत्याने दिसून आले आहे. यंदा या योजनेतून सर्वसाधारणमधील ४९८ तर विशेष घटक योजनेतून मागासवर्गीय २९० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता मागणी लाखात असते. यंदा ऑनलाइन नोंदणी केली असून, शुक्रवारी (ता. ३०) त्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नोंदणीचा आकडा मिळाला नसला तरी साधारण पंचवीस हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी कुक्‍कुटपालन योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी केली असल्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत मात्र केवळ शेकड्यात लाभ मिळत आहे. तीस टक्के निधीत कपात पशुसंवर्धन विभागातर्फे नावीन्यपूर्ण योजनेतून कुक्‍कुटपालन योजनेतून अनुदानाचा लाभ देण्यासाठी या वर्षासाठी सर्वसाधारणच्या ७११ लाभार्थ्यांना ७ कोटी ९९ लाख ८७ हजार ५०० रुपये तर विशेष घटकमधून ४१४ लाभार्थ्यांसाठी ६ कोटी ९८ लाख ६२ हजार ५०० अशी ११२५ लाभार्थ्यांसाठी १४ कोटी ९८ लाख ५० हजाराची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. मात्र आता तीस टक्के निधी कपात करुन उद्दिष्ठ दिले आहे. त्यामुळे ३३७ लाभार्थी कमी झाले आहे. जिल्हानिहाय उद्दिष्ट ठाणे ः १२, पालघर ः १२, रायगड ः १५, रत्नागिरी ः १३, सिंधुदुर्ग ः ८, पुणे ः ४४, सातारा ः ३०, सांगली ः २७, सोलापुर ः ४१, कोल्हापुर ः २४, नाशिक ः ३७, धुळे ः १५, नंदुरबार ः १२, जळगाव ः ३४, नगर ः ४७, अमरावती ः २८, बुलढाणा ः ३२, अकोला ः १९ वाशिम ः १६, नागपुर ः २१, भंडारा ः १४, वर्धा ः ११, गोंदिया ः १४, चंद्रपुर ः १८, गडचिरोली ः १२, औरंगाबाद ः २७, जालना ः २२, परभणी ः १८, लातूर ः २९, उस्मानाबाद ः २९, नांदेड ः नांदेड ः ३८, हिंगोली ः १४. बीड ः २८ एका कुटुंबातून एकच अर्ज नावीन्यपूर्ण योजनेतून कुक्‍कुटपालनसह योजनेसाठी याआधी एका कुटुंबातून एकापेक्षा जास्त अर्ज दिले जात होते. आता मात्र योजनेतून एका कुटुंबातील कोणत्याही एकाच व्यक्तीला अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा झाल्यापासून शिधापत्रिकांवरील सर्व नावे नमूद केले जात आहेत. सोडत पद्धतही ऑनलाइनच होणार आहे, असे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com