agriculture news in Marathi less cold min Kokan and Central Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

पुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने थंडीचे आगमन झाले आहे. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होऊन गारठा कमी झाला आहे. गुरुवारी (ता. २१) नगर येथे राज्यातील नीचांकी १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातही तापमान किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. आज (ता. २२) किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

पुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने थंडीचे आगमन झाले आहे. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होऊन गारठा कमी झाला आहे. गुरुवारी (ता. २१) नगर येथे राज्यातील नीचांकी १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातही तापमान किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. आज (ता. २२) किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडील राज्यातही थंडी वाढत असली, तरी अद्याप हे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत नसल्याने थंडीचा कडाका वाढलेला नाही. मात्र सकाळच्या वेळी हवेमध्ये गारठा अनुभवायला येत आहे. दिवसभर उन्हाचा चटका वाढत असून, अंशत: ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ होत आहे. तर किमान तापमानातही चढ-उतार सुरूच आहेत. गुरुवारी नगर येथील तापमानात दोन अंशांची वाढ झाल्याचे दिसून आले.

विदर्भ, मराठवाड्यात तापामानाचा पारा १५ ते १७ अंशांदरम्यान होता. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १४ ते २२ अंश, तर मराठवाड्यात २२ ते २४ अंशादरम्यान होते. गुरुवारी (ता. २१) पंजाबमधील लुधियाना येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

गुरुवारी (ता. २१) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १७.४ (३), नगर १४.६ (१), जळगाव १६.६ (२), कोल्हापूर २१.५ (४), महाबळेश्वर १६.० (१), मालेगाव १६.५ (२), नाशिक १५.८ (२), सांगली २१.९ (५), सातारा २०.८ (५), सोलापूर २०.९ (३), अलिबाग २३.४ (३), डहाणू २१.७ (१), सांताक्रूझ २२.२ (१), रत्नागिरी २४.२ (३), औरंगाबाद १६.९ (२), परभणी १६.० (०), नांदेड १६.५ (१), अकोला १६.० (-१), अमरावती १६.२ (-२), बुलडाणा १७.० (१), चंद्रपूर १८.२ (२), गोंदिया १५.५ (-१), नागपूर १५.१ (०), वर्धा १७.४ (१), यवतमाळ १५.४ (-२).


इतर अॅग्रो विशेष
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...