अकोला जिल्ह्यात फळबाग योजनेअंतर्गत कमी लागवड

फळबाग योजनेअंतर्गत कमी लागवड
फळबाग योजनेअंतर्गत कमी लागवड

अकोला : जिल्ह्यात या वर्षात राबविल्या जात असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत अातापर्यंत केवळ २७.८० हेक्टरवर लागवड झाली अाहे. वास्तविक जिल्ह्यात योजनेसाठी सुमारे १८०० पेक्षा अधिक अर्ज अाले अाहेत. जिल्ह्याला दोन कोटींचा अार्थिक अाणि १९१८.४७ हेक्टरचा लक्ष्यांक देण्यात अाला अाहे. त्या तुलनेत ही लागवड कमी आहे.

शासनाने दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या सन्मानार्थ राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू केली. यासाठी विविध फळपिकांच्या लागवडीचे धोरण ठरविण्यात अाले. या योजनेअंतर्गत अकोला तालुक्यासाठी १११.१० हेक्टर, बार्शीटाकळी २९८.३३, मूर्तिजापूर ११०, अकोट ३९७.५५, तेल्हारा ४६०.६५, बाळापूर १०१.४५ अाणि पातूर ४३९.४९ हेक्टरचे लक्ष्यांक देण्यात अाला अाहे.

जिल्ह्यातील ४७७  शेतकऱ्यांना ४९५ हेक्टर लागवडीचे पत्र देण्यात अाले अाहे. यापैकी २२४.३५ हेक्टरला तांत्रिक व प्रशासकीय मान्यतासुद्धा यंत्रणांकडून देण्यात अाली. मात्र, अातापर्यंत केवळ २७.८० हेक्टरवर या योजनेअंतर्गत फळबाग लागवड झाल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने अकोला तालुक्यात १२.८०, तेल्हारा येथे पाच अाणि पातूरमधील १० हेक्टर क्षेत्राचा समावेश अाहे. बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर या तालुक्यांमध्ये सुरवातही झालेली नसल्याचे दिसून येते. अाता ही लागवड करण्यासाठी  काही तालुक्यांमध्ये हालचाली सुरू झालेल्या अाहेत. मात्र, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत असंख्य अडचणी असल्याचे अधिकारी खासगीत मान्य करतात. दुष्काळी परिस्थितीचा फटका या लागवडीमागे असल्याचे शेतकरी सांगत अाहेत.

पाण्याची पातळी कमी झाल्याने उन्हाळ्यात फळबाग कशी जगवायची, असा पेच शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कृषी विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असतानाही भविष्यातील अडचणी पाहता शेतकरी लागवडीस धजावत नसल्याचे दिसून अाले अाहे. परिणामी या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com