agriculture news in marathi Less effect on New Soyabean arrival after Centrals import duty reduction decision | Page 2 ||| Agrowon

केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या दरावर परिणामाची शक्यता कमीच

अनिल जाधव
रविवार, 12 सप्टेंबर 2021

केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेले दर, तसेच अशा स्थितीत निर्यातक देश एकतर निर्यातशुल्क वाढवितात किंवा व्यापारी दर वाढवून निर्यात करतात, असा आजवरचा अनुभव आहे.

पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेले दर, तसेच अशा स्थितीत निर्यातक देश एकतर निर्यातशुल्क वाढवितात किंवा व्यापारी दर वाढवून निर्यात करतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे दरावर जास्त परिणाम होईल असे वाटत नाही. तसेच नगण्य साठा, पावसाने होत असलेले नुकसान आणि उत्पादकतेवर झालेला परिणाम यामुळे सोयाबीन दरावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही, असे जाणकारांनी सांगितले.

यंदा पेरणी लांबल्याने सोयाबीन आवकेचा हंगामही लांबला आहे. तरी देशातील काही बाजार समित्यांमध्ये लवकर लागवड झालेले सोयाबीन दाखल होत आहे. या सोयाबीनला चांगला दरही मिळत आहे. मात्र सरकारच्या निर्णयाने बाजारात संभ्रमाची स्थिती निर्माण केली आहे. मागील हंगामात तेजीला मुकलो मात्र या हंगामात तरी चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. मात्र जनुकीय सुधारित सोयापेंड आयातीला परवानगी, तसेच खाद्यतेल आयात शुल्कात कपात करून सरकार शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवते की काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. जाणकारांच्या मते या दोन्ही निर्णयाचा देशांतर्गत बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. 

आंतरराष्ट्रीय भाववाढीची झळ
देशाच्या एकूण गरजेपैकी जवळपास ७० टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरातील घडामोडींचा देशातील दरावर थेट परिणाम होतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव हे गेल्या वर्षीपेक्षा ७० ते ८० टक्क्यांनी वाढलेले आहेत. पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने देशातील भाववाढ रोखण्यासाठी आयातशुल्क कपात केली, असे जाणकारांनी सांगितले. या निर्णयाने देशांतर्गत बाजारात फार बदल होईल, अशी शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. 

जाणकार म्हणतात...

  • आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय सोयाबीनला मोठी मागणी
  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन अजूनही खातेय भाव
  • देशात शिल्लक साठा नसल्याने दराला आधार
  • अनेक ठिकाणी दुष्काळ, पूर, पावसाने नुकसान
  • नैसर्गिक आपत्तीने उत्पादकताही प्रभावित
  • शेतकऱ्यांनी बाजाराचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा

प्रतिक्रिया...
खाद्यतेल आयातशुल्क कपातीचा सोयाबीन दरावर परिणाम होणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत आहे, तसेच हंगाम लांबल्याने मागणी आहे. तसेच पावसाने नुकसान होत असल्याचे वृत्त असल्याने दर मजबूत राहतील. शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता बाजाराचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा.
- दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्‍लेषक 

खाद्य तेलाच्या आयात शुल्कात कपात केल्याने भारतातील खाद्य तेलाच्या भावावर जास्त परिणाम होताना दिसत नाही. साधारणपणे, भारताने आयात शुल्कात कपात केल्यावर मलेशिया आणि इंडोनेशिया निर्यात शुल्क वाढवतात. त्यामुळे भारतीय ग्राहकांना खाद्य तेलाच्या किमतीत दिलासा मिळताना दिसत नाही. पण या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना मात्र फटका बसतो. 
- डी. एन. पाठक, कार्यकारी संचालक, सोपा

सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तेल बियाण्याच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. पण या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमतीत ग्राहकांच्या पातळीवर जास्त परिणाम होताना दिसत नाही. भारताने आयात शुल्कात कपात केल्यावर निर्यातदार देश खाद्य तेलाच्या किमती वाढवतात. त्यामुळे आयात शुल्काने पाच रुपये कमी होणार असतील तर ग्राहकांपर्यंत एक दोन रुपयांचा फायदा पोहोचतो. 
 - बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, एसईए


इतर अॅग्रोमनी
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....