agriculture news in Marathi less possibility of rate down of kabuli chana Maharashtra | Page 2 ||| Agrowon

काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता कमी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या कोरोनाचा उद्रेक झाल्याने देशभरात लॉकडाउन असल्याने देशांतर्गत बाजार समित्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या कोरोनाचा उद्रेक झाल्याने देशभरात लॉकडाउन असल्याने देशांतर्गत बाजार समित्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यातच देशात कोरोनाची स्थिती बिकट झाल्याने अनेक देशांनी आयात बंद केली आहे. त्याचा परिणाम सध्या दरावर झाला असला तरी दर कमी होण्याची शक्यता नाही, अशी माहिती जाणकारांनी दिली. 

देशात सध्या कोरोना उद्रेक झाला आहे. त्यामुळे लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्याचा परिणाम शेतीमालाच्या बाजारावर झाला आहे. काबुली हरभऱ्याला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लग्न-समारंभातून मोठी मागणी असते. मात्र कोरोनामुळे निर्बंध असल्याने या क्षेत्रांतून मागणी घटली आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणीवर परिणाम झाला असून, दरात तेजी-मंदीची स्थिती नाही. तसेच आयातदार देशांनी कोरोनामुळे भारतातून आयात जवळपास थांबविली आहे. त्यामुळे दरातील तेजीला ब्रेक लागल्याची स्थिती आहे. मात्र काबुली हरभऱ्याचे दर घसरण्याची शक्यता नाही, असे जाणकारांनी म्हटले आहे. 

सध्या सुदान देशातून छोटा काबुली हरभरा देशी काबुली हरभऱ्याच्या तुलनेत कमी दरात मिळत आहे. त्याचाही परिणाम देशातील हरभरा मागणीवर झाला आहे. मात्र कोरोना स्थिती निवळल्यानंतर बाजार पुन्हा पूर्वपदावर येईल आणि दरात तेजी येण्याची शक्यता आहे. सध्या जगात भारत आणि कॅनडा या दोनच देशांत काबुली हरभऱ्याची स्थिती ठीकठाक असल्याचे बोलले जाते. सध्या ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात मिळून ३.१५ लाख टन साठा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जागतिक पातळीवर भारत आणि कॅनडातूनच निर्यातीची शक्यता आहे. कोरोनाचे संकट गेल्यानंतर भारतातून निर्यात वाढण्याची शक्यता असून दरही वाढतील, असे जाणकारांनी सांगितले. 

बाजारावर लॉकडाउनचा परिणाम 
देशातील बाजार समित्यांच्या कामकाजावर लॉकडाउनमुळे परिणाम झाला आहे. बाजार समित्यांत खरेदी-विक्रीचे व्यवहार नगण्य होत आहेत. लॉकडाउनमधून सरकारने या वेळी वाहतुकीला वगळले असले, तरी मालच येत नसल्याचा त्याचा लाभ होताना दिसत नाही. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या राज्यांतील जास्त पुरवठा असणाऱ्या बाजार समित्या बंद आहेत किंवा व्यवहार कमी आहेत. 

जागतिक स्थिती 

  • जागतिक पातळीवर उत्पादन घटण्याची शक्यता 
  • कोरोनामुळे पुरवठा कमी असूनही तेजी नाही 
  • बाजार समित्या बंद असल्याचाही दरावर परिणाम 
  • पाकिस्तानने आयात वाढविली 
  • ऑस्ट्रेलिया, कॅनडात ३.१५ लाख टन साठ्याची शक्यता 
  • भारत आणि कॅनडातच साठा उपलब्ध 
  • इतर देशांत साठा कमी, निर्यातीची शक्यताही कमीच

इतर बातम्या
सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने...
कृषी परिषदेत संचालक नेमण्यासाठी मुहूर्त...पुणे ः राज्याच्या कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी...
कोकणात जोरदार पाऊसपुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच...
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
‘एफआरपी’चा अभ्यास सुरू पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या...
‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून...पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग...
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत...अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...