Chana Market Rate : हरभरा दरात घसरणीची शक्यता कमी

हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत बाजारात आवकेचा दबाव वाढू शकतो. सध्या देशभरातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला ३५०० रुपयांपासून ५१८५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
gram
gram

पुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत बाजारात आवकेचा दबाव वाढू शकतो. सध्या देशभरातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला ३५०० रुपयांपासून ५१८५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर किंचित परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र नाफेडच्या खरेदीमुळे दरात जास्त घसरण होण्याची शक्यता कमीच आहे. उत्पादनातील घट, वाढलेली मागणी आणि नाफेडच्या खरेदीचा आधार यामुळे हरभरा दरातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

मागील काही वर्षांपासून हरभरा दर खालच्या पातळीवर स्थिर होते. परंतु यंदा दरात सुधारणा होत आहे. बाजारात साठेबाजांनी खरेदी वाढविल्यानेही दाराला आधार मिळत आहे. त्यातच नुकतेच उत्तर भारतातील काही राज्यांत पाऊस पडला. त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. राजस्तान आणि मध्य प्रदेशातील हरभरा उत्पादक पट्यात पाऊस झाल्याने हरभऱ्याला फटका बसला आहे. पावसामुळे पीक काढणी लांबू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.  दरवाढीला अनुकूल घटक 

  • नाफेडने सुरू केलेली खरेदी 
  • वायदे बाजारात हरभरा दरात तेजी 
  •  लग्न-समारंभ, सण यामुळे बेसनाला वाढलेली मागणी 
  • पिकाची उत्पादकता घटली 
  • नाफेडकडे कमी साठा 
  • मटारच्या जागेवर हरभऱ्याला पसंती वाढली 
  • हरभरा बाजारातील घडामोडी 

  • मागील महिनाभरात राजस्थानमध्ये हरभरा ४७५ रुपयांनी आणि मध्य प्रदेशात ४५० रुपयांनी वाढला 
  • अनेक ठिकाणी हरभरा दर हमीभावाच्या वर पोहोचले 
  • पुढील १० ते १२ दिवसांत बाजारात आवकेचा दबाव वाढेल 
  • आवकेच्या दबावाने दरावर किंचित परिणाम शक्य 
  • दर वाढत असल्याने सरकारची खरेदी कमी होण्याची शक्यता 
  • नाफेडच्या खरेदीने आवक वाढूनही दर कायम राहण्याची शक्यता 
  • वायद्यांतही वाढ  वायदे बाजारात हरभरा दरात वाढ पाहायला मिळाली. १ जानेवारीला मार्चच्या वायद्यासाठी ४४४९ रुपयांनी सौदे झाले, तर १२ मार्चला ६६६ रुपयांनी वाढून ५११५ रुपयांनी हे सौदे बंद झाले. तर एक जानेवारीला एप्रिलचे सौदे ४४६० रुपयांनी झाले आणि १२ मार्चला ६६० रुपयांनी वाढून ५१२० रुपयांनी बंद झाले. तर हजर बाजारातही हरभरा दर वाढले आहेत. १ जानेवारीला राजस्थानमध्ये ४७०० रुपये दराने विक्री झाली, तर १२ मार्चला ५१७५ रुपये दर मिळाला. मध्य प्रदेशात १ जानेवारीला ४६७५ रुपये आणि १२ मार्चला ५१२५ रुपयांनी सौदे झाले.  पावसाचा फटका  राजस्थान आणि मध्य प्रदेशातील हरभरा उत्पादक पट्ट्यात नुकतेच पाऊस झाला. त्याचा फटका पिकाला बसला आहे. राजस्तानमध्ये ठिकठिकाणी पाऊस झाला. तसेच मध्य प्रदेशातील सागर भागात पाऊस झाल्याने नुकसानीची माहिती आहे. तर पावसामुळे पीक काढणी लांबू शकते. पावसाचा गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो.  राज्यनिहाय नाफेडची खरेदी (टनांत) (११ मार्चपर्यंत)  ४३  आंध्र प्रदेश  ६३८७  महाराष्ट्र  २५२  कर्नाटक  २६०७  गुजरात  विविध राज्यांतील बाजार समित्यांतील दर (रुपये/प्रतिक्विंटल)  आंध्र प्रदेश  कर्नुल : २६०० ते ४६९५  नंदीकोटकूर : ४६२० ते ४६७०  गुजरात  अमरेली : ३५०० ते ४६१५  दाहोड : ४७०० ते ४८००  जामनगर : ४२७५ ते ४६७०  कर्नाटक  विजापूर : ४८५० ते ४९००  रायचूर : ४४०९ ते ४८०१  मध्य प्रदेश  सनावाड : ४५२५ ते ५१८५  पिपरिया : ४४३० ते ४९८०  मनसा : ३८०० ते ४९६१  वायद्यांतही वाढ  वायदे बाजारात हरभरा दरात वाढ पाहायला मिळाली. १ जानेवारीला मार्चच्या वायद्यासाठी ४४४९ रुपयांनी सौदे झाले, तर १२ मार्चला ६६६ रुपयांनी वाढून ५११५ रुपयांनी हे सौदे बंद झाले. तर एक जानेवारीला एप्रिलचे सौदे ४४६० रुपयांनी झाले आणि १२ मार्चला ६६० रुपयांनी वाढून ५१२० रुपयांनी बंद झाले. तर हजर बाजारातही हरभरा दर वाढले आहेत. १ जानेवारीला राजस्तानमध्ये ४७०० रुपये दराने विक्री झाली, तर १२ मार्चला ५१७५ रुपये दर मिळाला. मध्य प्रदेशात १ जानेवारीला ४६७५ रुपये आणि १२ मार्चला ५१२५ रुपयांनी सौदे झाले.  प्रतिक्रिया नाफेड खरेदी सुरू झाल्याने दाराला आधार मिळाला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांत गारपीट आणि पावसाने नुकसान झाले. त्यामुळे दरात सुधारणा पाहायला मिळत आहे. बाजारात आवकेचा दबाव वाढल्यानंतरही दर कमी शक्यता नाही. दर घसरल्यास शेतकरी माल बाजारात आणणार नाहीत नाफेडला विकतील. त्यामुळे दर घसरतील असे वाटत नाही.  - सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार विश्‍लेषक 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com