agriculture news in Marathi less possibility of reduction in gram rate Maharashtra | Page 4 ||| Agrowon

हरभरा दरात घसरणीची शक्यता कमी

अनिल जाधव
रविवार, 14 मार्च 2021

हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत बाजारात आवकेचा दबाव वाढू शकतो. सध्या देशभरातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला ३५०० रुपयांपासून ५१८५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

पुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत बाजारात आवकेचा दबाव वाढू शकतो. सध्या देशभरातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला ३५०० रुपयांपासून ५१८५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर किंचित परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र नाफेडच्या खरेदीमुळे दरात जास्त घसरण होण्याची शक्यता कमीच आहे. उत्पादनातील घट, वाढलेली मागणी आणि नाफेडच्या खरेदीचा आधार यामुळे हरभरा दरातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

मागील काही वर्षांपासून हरभरा दर खालच्या पातळीवर स्थिर होते. परंतु यंदा दरात सुधारणा होत आहे. बाजारात साठेबाजांनी खरेदी वाढविल्यानेही दाराला आधार मिळत आहे. त्यातच नुकतेच उत्तर भारतातील काही राज्यांत पाऊस पडला. त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. राजस्तान आणि मध्य प्रदेशातील हरभरा उत्पादक पट्यात पाऊस झाल्याने हरभऱ्याला फटका बसला आहे. पावसामुळे पीक काढणी लांबू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

दरवाढीला अनुकूल घटक 

  • नाफेडने सुरू केलेली खरेदी 
  • वायदे बाजारात हरभरा दरात तेजी 
  •  लग्न-समारंभ, सण यामुळे बेसनाला वाढलेली मागणी 
  • पिकाची उत्पादकता घटली 
  • नाफेडकडे कमी साठा 
  • मटारच्या जागेवर हरभऱ्याला पसंती वाढली 

हरभरा बाजारातील घडामोडी 

  • मागील महिनाभरात राजस्थानमध्ये हरभरा ४७५ रुपयांनी आणि मध्य प्रदेशात ४५० रुपयांनी वाढला 
  • अनेक ठिकाणी हरभरा दर हमीभावाच्या वर पोहोचले 
  • पुढील १० ते १२ दिवसांत बाजारात आवकेचा दबाव वाढेल 
  • आवकेच्या दबावाने दरावर किंचित परिणाम शक्य 
  • दर वाढत असल्याने सरकारची खरेदी कमी होण्याची शक्यता 
  • नाफेडच्या खरेदीने आवक वाढूनही दर कायम राहण्याची शक्यता 

वायद्यांतही वाढ 
वायदे बाजारात हरभरा दरात वाढ पाहायला मिळाली. १ जानेवारीला मार्चच्या वायद्यासाठी ४४४९ रुपयांनी सौदे झाले, तर १२ मार्चला ६६६ रुपयांनी वाढून ५११५ रुपयांनी हे सौदे बंद झाले. तर एक जानेवारीला एप्रिलचे सौदे ४४६० रुपयांनी झाले आणि १२ मार्चला ६६० रुपयांनी वाढून ५१२० रुपयांनी बंद झाले. तर हजर बाजारातही हरभरा दर वाढले आहेत. १ जानेवारीला राजस्थानमध्ये ४७०० रुपये दराने विक्री झाली, तर १२ मार्चला ५१७५ रुपये दर मिळाला. मध्य प्रदेशात १ जानेवारीला ४६७५ रुपये आणि १२ मार्चला ५१२५ रुपयांनी सौदे झाले. 

पावसाचा फटका 
राजस्थान आणि मध्य प्रदेशातील हरभरा उत्पादक पट्ट्यात नुकतेच पाऊस झाला. त्याचा फटका पिकाला बसला आहे. राजस्तानमध्ये ठिकठिकाणी पाऊस झाला. तसेच मध्य प्रदेशातील सागर भागात पाऊस झाल्याने नुकसानीची माहिती आहे. तर पावसामुळे पीक काढणी लांबू शकते. पावसाचा गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो. 

राज्यनिहाय नाफेडची खरेदी (टनांत) (११ मार्चपर्यंत) 
४३ 
आंध्र प्रदेश 
६३८७ 
महाराष्ट्र 
२५२ 
कर्नाटक 
२६०७ 
गुजरात 

विविध राज्यांतील बाजार समित्यांतील दर (रुपये/प्रतिक्विंटल) 
आंध्र प्रदेश 

कर्नुल : २६०० ते ४६९५ 
नंदीकोटकूर : ४६२० ते ४६७० 

गुजरात 
अमरेली :
३५०० ते ४६१५ 
दाहोड : ४७०० ते ४८०० 
जामनगर : ४२७५ ते ४६७० 

कर्नाटक 
विजापूर :
४८५० ते ४९०० 
रायचूर : ४४०९ ते ४८०१ 

मध्य प्रदेश 
सनावाड :
४५२५ ते ५१८५ 
पिपरिया : ४४३० ते ४९८० 
मनसा : ३८०० ते ४९६१ 

वायद्यांतही वाढ 
वायदे बाजारात हरभरा दरात वाढ पाहायला मिळाली. १ जानेवारीला मार्चच्या वायद्यासाठी ४४४९ रुपयांनी सौदे झाले, तर १२ मार्चला ६६६ रुपयांनी वाढून ५११५ रुपयांनी हे सौदे बंद झाले. तर एक जानेवारीला एप्रिलचे सौदे ४४६० रुपयांनी झाले आणि १२ मार्चला ६६० रुपयांनी वाढून ५१२० रुपयांनी बंद झाले. तर हजर बाजारातही हरभरा दर वाढले आहेत. १ जानेवारीला राजस्तानमध्ये ४७०० रुपये दराने विक्री झाली, तर १२ मार्चला ५१७५ रुपये दर मिळाला. मध्य प्रदेशात १ जानेवारीला ४६७५ रुपये आणि १२ मार्चला ५१२५ रुपयांनी सौदे झाले. 

प्रतिक्रिया
नाफेड खरेदी सुरू झाल्याने दाराला आधार मिळाला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांत गारपीट आणि पावसाने नुकसान झाले. त्यामुळे दरात सुधारणा पाहायला मिळत आहे. बाजारात आवकेचा दबाव वाढल्यानंतरही दर कमी शक्यता नाही. दर घसरल्यास शेतकरी माल बाजारात आणणार नाहीत नाफेडला विकतील. त्यामुळे दर घसरतील असे वाटत नाही. 
- सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार विश्‍लेषक 


इतर अॅग्रोमनी
खाद्य तेलाच्या किमती आटोक्यात आणणार :...नवी दिल्ली : देशातील खाद्य तेलाच्या किरकोळ...
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९००...नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (...
सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून...
चीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार पुणे : शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या...
राज्यात शिल्लक साखरेचा बोजा कायम कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
हळदीच्या आवकेत वाढसांगली ः हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते...
तूर आयातीचा परिणाम दीर्घकाळ कमीच राहील पुणे ः सरकारने वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी ६ लाख टन...
राज्यातून २० लाख टन साखरनिर्यातीचे करार कोल्हापूर ः यंदा साखर उत्पादनाबरोबरच...
आयातीने तुरीच्या दरावर परिणाम शक्य पुणे ः उडीद आयातीला गेल्या आठवड्यात परवानगी...
आवक वाढूनही हरभरा दर टिकून पुणे ः यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण...
देशातील कापूस उत्पादन ३५८ लाख गाठींवर...नवी दिल्ली ः देशात यापूर्वी कापसाचे ३६० लाख गाठी...
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...