देशांतर्गत दरवाढीमुळे निर्यातीला कमी पसंती

आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबरच देशांतर्गत बाजारात कापसाचे दर सुधारले आहेत. त्यातच देशांतर्गत दर तेजीत असल्याने निर्यातीपेक्षा जास्त दर मिळत आहे.
देशांतर्गत दरवाढीमुळे निर्यातीला कमी पसंती Less preference for exports due to domestic price hike
देशांतर्गत दरवाढीमुळे निर्यातीला कमी पसंती Less preference for exports due to domestic price hike

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबरच देशांतर्गत बाजारात कापसाचे दर सुधारले आहेत. त्यातच देशांतर्गत दर तेजीत असल्याने निर्यातीपेक्षा जास्त दर मिळत आहे. त्यातच वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे निर्यात आणखी महाग होत आहे. त्यामुळे कपसाचे फ्यूचर निर्यात करार यंदा केवळ दीड ते दोन लाख गाठींवर (एक कापूस गाठ = १७० किलो) झाले. मागील हंगामात याच काळात ५ ते ८ लाख गाठींचे करार झाले होते. एकूणच काय यंदा देशात कापसाला चांगल्या दराचा आधार मिळत आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली. देशातून गेल्या हंगामात, २०२०-२१ मध्ये बांगलादेश, चीन आणि व्हिएतनाम या देशांमध्ये ७० ते ७५ लाख गाठींची निर्यात झाली होती. मात्र एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या नव्या हंगामात देशांतर्गत कापसाचे दर वाढल्याने निर्यातीसाठीचे फ्यूचर करार कमी होत आहेत. देशातील कापूस व्यापाऱ्यांनी विपणन वर्ष २०२१-२२ मध्ये आतापर्यंत दीड लाख ते दोन लाख गाठी कापूस निर्यातीचे फ्यूचर करार केले आहेत. गेल्या हंगामात ५ लाख ते ८ लाख कापूस गाठींचे निर्यात करार झाले होते. त्यातच वाहतूक खर्चात ८९ ते १०५ सेंट प्रतिपौंड निर्यात खर्चात वाढ झाल्यानेही निर्यात करार अडकले आहेत.  मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर (एमसीएक्स) ऑक्टोबरचे कापूस डिलिव्हरीचे करार शुक्रवारी (ता. ८) ३१ हजार ८० रुपयांवर पोहोचले होते. तर सीबॅटवर प्रतिपौंड ११३.९३ सेंटवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढल्यानंतर देशांतर्गत दरही वाढले आहेत. देशांतर्गत वाढता वापर, यंदा कमी झालेली लागवड आणि कापूस काढणीच्या काळात झालेल्या पावासाने मोठे नुकसान झाले होते, अशी माहिती जाणकारांनी दिली.  

प्रतिक्रिया यंदा करार झालेल्यांपैकी जास्त कापूस हा बांगलादेश आणि चीन यांच्याकडे जाणार आहे. निर्यात करार झालेल्या कापसाची डिलिव्हरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत होणार आहे. - विनय कोटक, संचालक, कोटक गिनिंग आणि प्रेसिंग इंडस्ट्री 

प्रतिक्रिया

जागतिक बाजारात चीनची वाढती मागणी, देशांतर्गत झालेला पाऊस, रुपयाचे अवमूल्यन झाल्याने महाग पडणारी आयात यामुळे निसर्गाने झोडपले असले तरी शेतकऱ्यांना बाजार साथ देण्याची शक्यता आहे. जागितक बाजारात कापूस ११३ ते ११४ सेंटवर पोहोचला आहे. सुताला चांगली मागणी असल्याने सूतगिरण्यांना चांगले मार्जिन मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. पावसाने खराब झालेला कापूस शेतकरी आता विकू शकतात. मात्र चांगला कापूस फेब्रुवारीनंतर विकण्याचा निर्णय घेतल्यास आठ हजार रुपयांपर्यंतही दर मिळू शकतो. - राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com