agriculture news in marathi, less rainfall in six taluka, nagar, maharashtra | Page 2 ||| Agrowon

नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमी पाऊस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच पाऊस आहे. आतापर्यंत केवळ अकोले तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडलेली असून तेथे सरासरीच्या दुप्पट पाऊस झालेला आहे. कर्जत तालुक्यात मात्र आतापर्यंत केवळ ३४ टक्केच पाऊस झाल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. अकोले तालुक्यातील पावसावर अवलंबून असलेली उत्तरेतील धरणे पूर्ण भरलेली असली दक्षिण भागातील काही धरणे मात्र कोरडीठाक आहेत. 

नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच पाऊस आहे. आतापर्यंत केवळ अकोले तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडलेली असून तेथे सरासरीच्या दुप्पट पाऊस झालेला आहे. कर्जत तालुक्यात मात्र आतापर्यंत केवळ ३४ टक्केच पाऊस झाल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. अकोले तालुक्यातील पावसावर अवलंबून असलेली उत्तरेतील धरणे पूर्ण भरलेली असली दक्षिण भागातील काही धरणे मात्र कोरडीठाक आहेत. 

नगर जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस नाही. आतापर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार जिल्ह्यामधील २६ महसूल मंडळांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. साधारण २५ महसूल मंडळांत ७५ टक्के तर ९ महसूल मंडळांत शंभर टक्क्यांच्या जवळपास पाऊस झाला. चार महसूल मंडळांमध्ये तर २५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. यंदा पावसाळ्याचे तीन महिने संपत आले असतानाही अजूनही अनेक भागांत जोराचा पाऊस नाही. त्याचा परिणाम खरिपावर झाला असून रब्बीची चिंता लागली आहे.

गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात मोठे नुकसान झाले. चारा आणि पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. यंदा परिस्थिती सुधारण्याची आशा असताना पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना मात्र घोर लागला आहे. अल्प पावसावर पिके तरारलेली दिसत असली तरी उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जोराचा पाऊस नसल्याने पाणीटंचाईशी सामना करावा लागत असून परतीचा पाऊस चांगला झाला नाही तर रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी ४९७.४ मिलिमीटर असून आतापर्यंत ४०५.९४ मिमी पाऊस झाल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. फक्त अकोल्यात आतापर्यंत १०६८ मिमी म्हणजे दुपटीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे 

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी (कंसात मिलिमीटरमध्ये झालेला पाऊस)
अकोले ः २१५.३७ (१०६८), संगमनेर ः ९९.८६ (४१६), कोपरगाव ः ९२.४६ (४०७), श्रीरामपूर ः ७५.१२ (३५३), राहुरी ः ७१.६३ (३४३), नेवासा ः ९७.५० (५१८), राहाता ः ७२.६९ (३२०), नगर ः ७४.४७ (३९२), शेवगाव ः ३७.३२ (३७९), पाथर्डी ः ६६.०९ (३६३), पारनेर ः ६४.७८ (३०७), कर्जत ः ३४.४६ (१७४), श्रीगोंदा ः ६९.९५ (३१२), जामखेड ः ५२.६४ (३२९).

चार धरणे कोरडी
जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे व मुळा ही उत्तरेतील मोठी आणि महत्त्वाची धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे केलेला आहे. मात्र, अजूनही चांगला पाऊस नसल्याने दुष्काळग्रस्त तालुक्यातील सीना, खैरी, घाटशीळ, मांडओहळ यांसह गाव पातळीवरील मध्यम व लघु प्रकल्प, गाव तलाव, पाझर तलाव, नद्या, नाले कोरडे आहेत. सध्या सीना धरणात ७, खैरी धरणात २, मांडओहळ धरणात २२ तर घाटशीळ धरणात ० टक्के पाणीसाठा आहे.

इतर ताज्या घडामोडी
तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनमहाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक असलेल्या तुरीची...
औरंगाबादेत सीताफळ २५०० ते ७००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धो धो पावसात भिजत शरद पवारांचे...सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद...
सियाम कडून पूरग्रस्तांसाठी दीड कोटींचे...औरंगाबाद  : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित...
नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घटनांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी...
चिखली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरीअकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी...
आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदीधामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या...
कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ...जालना : ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त...
मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल...नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना...
अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत...सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या...
कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत...कोल्हापूर, सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा दिवसांच्या...
बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाकनाशिक : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी...
परभणी जिल्ह्यात हरभऱ्याची २ हजार ९००...परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य)...
नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०...
शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच...शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या...
बियाणे उद्योगाच्या विकासासाठी स्थितीत...बियाणे उद्योगात आपले राज्य पूर्वीपासून अग्रेसर...
हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन...जळगाव ः उडीद, मुगाची शासकीय खरेदी केंद्रांत...
ढगाळ हवामानामुळे साताऱ्यातील...सातारा  ः अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाचे...
जिल्हा बॅंकांची आर्थिक कोंडी चिंताजनकभूविकास बॅंका मृत्युशय्येवर गेल्यापासून...
प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्जमुंबई ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१...