साताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी

साताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी
साताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमी

सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून प्रतिसाद काहीसा कमी झाला आहे. या योजनेतून आजपर्यंत जिल्ह्यात १३५९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांत १९६ शेततळी पूर्ण झाली आहेत. 

राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. या योजनेतून जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ५४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ४२२१ अर्ज पात्र; तर ११९७ अर्ज अपात्र ठरले असून, ५४ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी ३६७२ अर्जांना मंजुरी देण्यात आली. २८९८ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या १०२ शेततळ्यांचे काम सुरू असून, १३५९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. 

या योजनेतील काही अटी शिथिल केल्यानंतर ही योजना सर्वसमावेशक झाल्याने प्रतिसाद वाढत गेला होता. यातून अनेक शेततळी पूर्ण झाली होती. मात्र, गेल्या चार महिन्यांत या योजनेस कमी प्रतिसाद मिळू लागला आहे. यामुळे अपेक्षित शेततळी पूर्ण झालेली नाही. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत या योजनेचे शेतकऱ्यांनी पाठ केल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सप्टेंबर २०१८ पासून नऊ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात अवघी १९६ शेततळी पूर्ण झाली आहे. 

जिल्ह्याच्या पश्चिम भागात दुष्काळी भीषण स्वरूप धारण करू लागला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळे हा प्रभावी उपायापैकी एक आहे. संरक्षित पाणीसाठी करण्यासाठी शेततळे फायदेशीर असल्याने जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी शेततळे उभारणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांत जास्तीतजास्त जागृती करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे.

तालुकानिहाय शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे  सातारा ८१, कोरेगाव १९४, खटाव २२८, माण ३०४, फलटण २६९, वाई ७५, खंडाळा ८१, महाबळेश्वर ३, जावली १७, पाटण १४, कऱ्हाड ९३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com