कृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या नवीन संकरित गायी-म्
ताज्या घडामोडी
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे गुंडाळून ठेवण्याची वेळ
अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत किमत खरेदी योजनेला कुठेही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. अकोला जिल्ह्यात तर आता यंत्रणांना वजनकाटे गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. अकोला येथील खरेदी केंद्रावर मंगळवारी (ता. १९) भेट दिली असता सर्वत्र शुकशुकाट पसरलेला होता. हंगामात येथे खरेदी झालेली नसल्याचे सांगण्यात आले.

शासनाने शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी हमी दर जाहीर केलेले आहेत. यानुसार खरेदीसाठी गेल्या काही दिवसात ऑनलाइन नावनोंदणी सुरू करण्यात आली होती. सुरवातीला मूग, उडीद आणि नंतरच्या टप्प्यात सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्यात आली. नोंदणीनंतर शासनाकडून खरेदी केंद्रही कार्यान्वित करण्यात आले आहेत. परंतु कुठल्याच केंद्रावर यंदा शेतमाल विक्रीसाठी शेतकरी आलेले नाहीत. नावनोंदणी केलेल्यांना यंत्रणांकडून शेतमाल विक्रीला आणण्याचे मेसेजसुद्धा मोबाईलवर दिले जात आहेत. परंतु शेतकरी या केंद्रावर येताना दिसत नाही.
दरम्यान, हमीभाव खरेदी ही उच्च दर्जाच्या (एफएक्यू) मालाची केली जाते. असा शेतमाल फारच कमी असल्याने आणि बाजारपेठेत हमीभावापेक्षाही अधिक दर मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्राकडे येत नसल्याची बाब वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केली. शेतमालाच्या नावनोंदणीला शासनाकडून १५ डिसेंबरपर्यंत मुदतही वाढविण्यात आली आहे. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने हंगामात सुरु केलेल्या ३३ केंद्रावर मिळून ३००० क्विंटलची खरेदी झालेली आहे. यातही मुगाचीच खरेदी सर्वाधिक झालेली आहे.
- 1 of 578
- ››