नगर जिल्ह्यात मनरेगाच्या कामांवर मजूर संख्या रोडावली

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने मागेल त्यास रोजगार पुरविण्याची तयारी केली आहे. ज्या कामांना पाण्याची आवश्यकता नाही अशा रस्ते, खड्डे खोदणे, चर खोदणे या मेहनतीच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. - जितेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : प्रत्येक हाताला काम आणि मजुरीचा दाम देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात प्रशासनाने ३२ हजार ३३७ कामे करण्याची तयारी ठेवली आहे. या कामांत एक कोटी दोन लाख ७८ हजार दिवसांचा रोजगार देण्याची क्षमता आहे. मात्र, मजूर खासगी कामाला पसंती देत आहेत. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर मजुरांची संख्या रोडावल्याचे चित्र प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

प्रशासनाने दुष्काळी स्थितीत गरज असेल, त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात ग्रामपंचायत ६८६ व इतर यंत्रणा ३२८ अशी एक हजार १४ कामे सुरू करण्यात आली आहेत. यावर १६ हजार ३५३ मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. काम करणाऱ्या मजुरास सरासरी २०६ रुपये मजुरी प्रतिदिवस मिळत आहे. वृक्षसंगोपन, संवर्धन, निगराणी आदी रोजंदारीच्या कामांबरोबरच ब्रासवर केल्या जाणाऱ्या कामांचा समावेश आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतींची २३ हजार ४३८ कामे आहेत.

इतर यंत्रणांतर्फे आठ हजार८९९ आहे, अशी ३२ हजार ३३७ कामे करण्याची तयारी ठेवली आहे. या कामातून जिल्हाभरात एक कोटी दोन लाख ७८ हजार दिवसांचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो.  दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच मजुरांच्या संख्येत सहा हजारांपर्यंत घट झाली होती. त्यामुळे या योजनेचा मूळ उद्देश सफल होताना दिसत नाही. रोजगार हमी योजनेवर मजूर २०६ रुपये इतक्‍या कमी मजुरीवर काम करण्यास तयार नसतात. त्यामुळे ही संख्या कमी दिसत आहे.  तालुकानिहाय कामे आणि मजूर उपस्थिती 

तालुका कामे मजूर उपस्थिती
अकोले ८९ ३९६
जामखेड  ७१ १३२६
कर्जत  ६७ २४०९
कोपरगाव  ९५ ३२०
नगर  ६४ ६१९
नेवासे २१ ९४
पारनेर  ११६ ६२४१
पाथर्डी ७८ ६०९
राहाता  ११० ३७२
राहुरी ४० २३३
संगमनेर ९७ १०६९ 
शेवगाव   ४६ १६०९
श्रीगोंदे  ८२ ९०६
श्रीरामपूर ३८ १५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com