भंडारा : पावणेसहा लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

पावणेसहा लाख मतदारांची मतदानाकडे पाठ
पावणेसहा लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

भंडारा : शहरी भागापेक्षा दुर्गम आणि नक्षलप्रवण भागात वाढलेली मतदानाची टक्‍केवारी उत्साहवर्धक आहे. मात्र या वेळी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात तब्बल पावणेसहा लाख मतदारांनी आपला हक्‍कच बजावला नसल्याचे वास्तवही समोर आले आहे.  

या मतदारसंघात १८ लाख ८ हजार ७३४ मतदार आहेत. या वेळी मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्याच्या परिणामी मतदानाची टक्‍केवारी गेल्या वेळच्या तुलनेत वाढली. मात्र पावणेसहा लाख मतदार मतदानापासून दूर राहिले. 

या मतदारसंघातील ९ लाख ५ हजार २७२ पुरुष मतदारांपैकी ६ लाख २६ हजार ७४९ पुरुषांनी मतदानाचा हक्‍क बजावला. तब्बल २ लाख ७८ हजार ५२३ मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेच नाहीत. त्यासोबतच ९ लाख तीन हजार ४६० महिलांपैकी ६ लाख ८ हजार १४७ महिलांनी मतदानाचा हक्‍क बजावला. तब्बल दोन लाख ९५ हजार १३३ महिला मतदारांनी मतदान केले नाही. 

विधानसभा क्षेत्रनिहाय विचार केल्यास शहरी मतदारांनीच मतदानाकडे पाठ फिरविल्याचे समोर आले. भंडारा शहरातील एक लाख २५ हजार ९१४ आणि गोंदिया शहरातील एक लाख १३ हजार ७५ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. तुमसर विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ३४, साकोली विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ७०५, अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील ७२ हजार २६८, तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८३ हजार ८४२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. 

कोणीही आले तरी उपयोग काय? ‘‘कोणीही निवडून आले, तरी सामान्यांचे जीवनमान बदलत नाही. रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत समस्या कायम आहेत. त्या समस्याच राजकारणी सोडवीत नसतील तर मतदान का करावे? असा प्रश्‍न काही मतदारांनी उपस्थित केला. काहींनी उन्हाचे कारण दिले. काही नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com