दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी राज्याची तिजोरी खाली करू

दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी राज्याची तिजोरी खाली करू
दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी राज्याची तिजोरी खाली करू

नगर : राज्यात दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळ निवारण्यासाठी केंद्राच्या योजनेवर राज्य सरकार अवलंबून नाही. ज्या प्रजेच्या जिवावर आम्ही राजा झालो, त्या प्रजेला सुखी ठेवणे आमचे कर्तव्य आहे. दुष्काळातील उपाययोजनेसाठी जितका पैसा लागेल तो पुरवला जाईल. राज्यातील बळिराजाला दिलासा देण्यासाठी वेळ पडली तर राज्याची तिजोरी खाली करू, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. नगर दौऱ्यावर आले असता, शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  

जानकर म्हणाले, ‘‘दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन केली आहे. पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्‍न कसा सोडवता येईल, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. पारनेर, शेवगाव, संगमनेर, कर्जत, जामखेड या तालुक्‍यातील टॅंकर कमी करून पाइपलाइनने पाणी देण्याचा विचार आहे. सिद्धिविनायक, साईबाबा ट्रस्टला निधी देण्यासाठी विनंती केली आहे. ज्या जिल्ह्यातून चारा छावणीची मागणी होईल, त्या ठिकाणी चारा छावण्या देण्यात येणार आहेत. परंतु, एका छावणीत दोनशेवर जनावरे नको याची अट ठेवली आहे. जिओ टॅगिंगसाठी पथक नेमले आहे.

मागील वेळी चारा छावणीत जो काही प्रकार घडला होता, त्याला आळा बसविण्यात येणार आहे. चारा कमी पडला तर ठाणे, पालघर येथून चारा आणला जाईल. सीएसआर फंडातून छावण्यांसाठी निधी दिला जाईल. मागील काळात पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. त्या पूर्वरत करण्यासाठी ३८ कोटी महावितरणला वर्ग करण्यात आले आहेत. आवश्‍यकता बघून तातडीने टॅंकर सुरू करण्यात येणार आहे. सरकारने जलयुक्त अभियान राबविले, परंतु आकाशातून पाणी पडले नाही. त्याला काय करणार, पाऊस पडल्यानंतर मात्र त्याचा परिणाम जाणवेल.

लोकसभेपूर्वी धनगर आरक्षणासाठी कटिबद्ध देशात धनगर समाजाला कुठेही आरक्षण नाही. आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आरक्षणाचा प्रश्‍न हा केंद्रीय स्तरावरील असल्याने, यासाठी अहवाल तयार करण्यात येत आहे. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही घेऊन लवकरच दिल्लीला जाणार असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी तो मार्गी लागेल, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे जानकर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com