Agriculture news in Marathi Let's answer BJP's casteism with secularism: Jayant Patil | Agrowon

भाजपच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देऊ ः जयंत पाटील

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021

या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे त्याला जातीयवादाने उत्तर नाही तर धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात केले. 

मुंबई ः या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे त्याला जातीयवादाने उत्तर नाही तर धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात केले. 

लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी गुरुवारी (ता. १४) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री पाटील हे मार्गदर्शन करताना बोलत होते. 

अल्पसंख्याक समाजातील मान्यवर नेते व कार्यकर्ते मधल्याकाळात भावनेच्या भरात एमआयएम या पक्षात गेले होते. त्या सर्वांच्या लक्षात आले की, एमआयएमचा दुरुपयोग भाजप सत्तेत टिकण्यासाठी करत आहे. भाजपाचे हितसंबंध जपण्यासाठी एमआयएमला उभं करुन अल्पसंख्याक समाजाची मते विभागून भाजपचा विजय होण्यासाठी मदत होते आहे हे लक्षात आले आहे. ही चूक पुन्हा होणार नाही म्हणून एमआयएममधील अनेक कार्यकर्ते, अनेक शहरात, जिल्ह्यात राष्ट्रवादीत येत आहेत. ही ताकद वाढत असताना अल्पसंख्याक समाजाने पाठिंबा दिला तर ही ताकद आणखी वाढायला मदत होईल, असे सांगतानाच आपल्या हितसंबंधांना बाधा पोचणार नाही. नगरपरिषदेत आपल्या हिताचे संरक्षण होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सर्व नगरसेवकांचे जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदगीर नगरपंचायतीतील एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.


इतर अॅग्रो विशेष
२४० एकरांसाठी सामुहिक स्वयंचलित ठिबक...ऊस व द्राक्षे या पिकांसाठी प्रसिद्ध अहिरवाडी (जि...
‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न...नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी...
हळदीचे दर स्थिर सांगली ः सध्या देशभरात देशात हळदीची ३७ लाख पोती...
ऊस पाचट वजावटीपोटी  २२५ कोटींवर डल्ला पुणे ः यंत्राने होणाऱ्या ऊसतोडीत पाचटाच्या...
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार...पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब...
देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍...नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल...
राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची...जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून...
निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका...अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या...
शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील...
जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर...पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता...
कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा...कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास...
कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववतबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...