ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत : राजू शेळके

ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत, तसेच वीज वितरणाची बोगस बिले भरणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत  Let's cut the usbila into pieces Will not be paid
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत  Let's cut the usbila into pieces Will not be paid

सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत, तसेच वीज वितरणाची बोगस बिले भरणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.  अंगापूर वंदन (जि. सातारा) येथे संघटनेचे संघटक मनोहर येवले यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजू केंजळे, कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, दत्तात्रय पाटील, संजय जाधव, रमेश पिसाळ आदी उपस्थित होते.  शेळके म्हणाले, ‘‘सातारा येथे ऊसदराचे (एफआरपी) तुकडे व महावितरणची बोगस बिले या विरोधामध्ये शेतकऱ्यांची एकजूट होत असून, संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर या बाबत गावोगावी शेतकरी मेळावे घेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ऊसदराचे तुकडे पाडणाऱ्या कारखान्याचे धुरांडे या वर्षी पेटू देणार नाही. शेतकऱ्यांनी थकीत ऊसबिल व ऊसदराचे तुकडे या विरोधात एकजूट करून लढले पाहिजे. आजपर्यंत फक्त शेजारच्या जिल्ह्यातील शेतकरी उसाच्या रास्त दरासाठी भांडत आहेत आणि आपला जिल्हा क्रांतिकारकांचा असून देखील गप्प बसून मिळेल तो व मिळेल तसा दर घेऊन लाचारपणे जगत आहे. आता याविरुद्ध आपणच लढा दिला पाहिजे.’’  शासनाने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार सानुग्रह अनुदान दिले नाही, तसेच महावितरण खोटी बिले छापून शेतीपंपाच्या वसुलीसाठी बिघाड करून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. एवढे असून सुद्धा एकही लोकप्रतिनिधी यावर अवाक्षर काढत नाही, असा आरोपही शेळके यांनी केला. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वत: लढण्यास तयार राहा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. मेळाव्यास राजेंद्र शेडगे, तुकाराम शेडगे, कृषिभूषण योगेश पवार, सौरभ कोकीळ, समाधान कणसे, अमोल कणसे, बजरंग कणसे, तसेच अंगापूर, वर्णे, फडतरवाडी, निगडी, कामेरी, धोंडेवाडी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com