Agriculture News in Marathi Let's cut the usbila into pieces Will not be paid | Agrowon

ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत : राजू शेळके

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत, तसेच वीज वितरणाची बोगस बिले भरणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे. 

सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत, तसेच वीज वितरणाची बोगस बिले भरणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे. 

अंगापूर वंदन (जि. सातारा) येथे संघटनेचे संघटक मनोहर येवले यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजू केंजळे, कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, दत्तात्रय पाटील, संजय जाधव, रमेश पिसाळ आदी उपस्थित होते. 

शेळके म्हणाले, ‘‘सातारा येथे ऊसदराचे (एफआरपी) तुकडे व महावितरणची बोगस बिले या विरोधामध्ये शेतकऱ्यांची एकजूट होत असून, संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर या बाबत गावोगावी शेतकरी मेळावे घेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ऊसदराचे तुकडे पाडणाऱ्या कारखान्याचे धुरांडे या वर्षी पेटू देणार नाही. शेतकऱ्यांनी थकीत ऊसबिल व ऊसदराचे तुकडे या विरोधात एकजूट करून लढले पाहिजे.

आजपर्यंत फक्त शेजारच्या जिल्ह्यातील शेतकरी उसाच्या रास्त दरासाठी भांडत आहेत आणि आपला जिल्हा क्रांतिकारकांचा असून देखील गप्प बसून मिळेल तो व मिळेल तसा दर घेऊन लाचारपणे जगत आहे. आता याविरुद्ध आपणच लढा दिला पाहिजे.’’ 

शासनाने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार सानुग्रह अनुदान दिले नाही, तसेच महावितरण खोटी बिले छापून शेतीपंपाच्या वसुलीसाठी बिघाड करून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. एवढे असून सुद्धा एकही लोकप्रतिनिधी यावर अवाक्षर काढत नाही, असा आरोपही शेळके यांनी केला. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वत: लढण्यास तयार राहा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

मेळाव्यास राजेंद्र शेडगे, तुकाराम शेडगे, कृषिभूषण योगेश पवार, सौरभ कोकीळ, समाधान कणसे, अमोल कणसे, बजरंग कणसे, तसेच अंगापूर, वर्णे, फडतरवाडी, निगडी, कामेरी, धोंडेवाडी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


इतर बातम्या
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधितबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस...