आळंदी यात्रेबाबत चर्चा करू : पटोले

सोलापूर : आळंदी देवस्थानची अगोदर पाहणी करून प्रमुख महाराज मंडळींशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर आळंदी यात्रेविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी (ता. ४) पंढरपुरात सांगितले.
Let's discuss Alandi Yatra: Patole
Let's discuss Alandi Yatra: Patole

सोलापूर  : आळंदी देवस्थानची अगोदर पाहणी करून प्रमुख महाराज मंडळींशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर आळंदी यात्रेविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी (ता. ४) पंढरपुरात सांगितले. 

 पटोले पंढरपूर दौऱ्यावर आले होते. पटोले यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर या वेळी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंढरपूर देवस्थान, विकास व व्यवस्थेसंदर्भात विधान भवनात बैठक बोलावणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांसह वारकऱ्यांनाही बोलवू, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी आळंदी येथील कार्तिकी यात्रेविषयी विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी वारकरी फडकरी दिंडी समाजाची पंढरपुरातील संत तुकाराम महाराज भवनात बैठक घेतली. आळंदी येथे दिंड्यांचे आगमन होणार आहे.

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करून दिंड्यांना आळंदीमध्ये प्रवेश द्यावा. त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी राहण्यास त्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी यावेळी वारकऱ्यांनी केली. त्यावर आपण प्रथम परिस्थिती पाहणी करू आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे पटोले यांनी सांगितले.

शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढावा

गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. चर्चा सुरू असल्या, तर त्यात प्रगती हवी, नेमके त्यांचे म्हणणे काय आहे, ते ऐकून घ्यावे, सध्या दिल्लीत खूप थंडी आहे. कडाक्याच्या थंडीत लाखो शेतकरी रस्त्यावर आहेत. या परिस्थितीत केंद्र सरकारने तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे, असे मतही पटोले यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com