Agriculture news in marathi Let's force the laws back | Page 2 ||| Agrowon

कायदे मागे घेण्यास भाग पाडू : किसान सभा

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जानेवारी 2021

केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडू, असा निर्धार करीत अखिल भारतीय किसान सभेचा नाशिक ते मुंबई वाहन मार्च, शनिवार (ता.२३) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राजधानी मुंबईकडे  झेपावला.

नाशिक: केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडू, असा निर्धार करीत अखिल भारतीय किसान सभेचा नाशिक ते मुंबई वाहन मार्च, शनिवार (ता.२३) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राजधानी मुंबईकडे  झेपावला. लढू अन् सरकारला कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडू, असा निर्धार या मोर्चात सहभागी झालेल्या हजारो शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थ्यांनी केला आहे. 

केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. मूठभर उद्योगपतींना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा घाट घातला जात आहे. याला विरोध करण्यासाठी गेल्या ५८ दिवसांपासून देशातील हजारो शेतकरी एकत्र येऊन संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्लीत ऐतिहासिक लढा देत आहे.

दिल्लीतील हा लढा मजबूत करण्यासाठी हा मार्च काढण्यात आला आहे.  केंद्र सरकारकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवले. शेतकरी न्याय हक्कांसाठी लढा देत असताना सरकार मनमानी करीत आहे. त्यामुळे आता सरकारला जाग आणण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा २३ ते २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. हा वाहन मार्च निघण्यापूर्वी सभा झाली. 

अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सचिव अजित नवले, सहसचिव सुनील मालुसरे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या मरीयम ढवळे, ‘डीवायएफ’च्या नेत्या प्रीती शेखर आदी 
उपस्थित होते.

दुपारनंतर वाहन मोर्चाने राजधानी मुंबईकडे कूच केली. राज्यभरातून हजारो आंदोलक सकाळी अकरा वाजेपासून वाहनांमधून गोल्फ क्लब मैदानावर जमा झाले होते. नाशिकवरून निघालेला वाहन मार्च २४ तारखेला सायंकाळी आझाद मैदानावर पोहचून महामुक्काम मोर्चा होईल. त्यानंतर २५ तारखेपासून मोर्चा राजभवनावर निघून २६ जानेवारीपर्यंत चालेल. 

तीन कृषी विरोधी कायदे, चार कामगार विरोधी कायदे, प्रस्तावित वीज बिल विधेयक मागे घेण्यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये पन्नास हजारांहून अधिक आंदोलक सहभागी होतील व लढा व्यापक करतील. सरकारने याची दखल घेतली नाही, तर संपूर्ण राज्यभरात जिल्हानिहाय आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती डॉ. ढवळे यांनी दिली.


इतर बातम्या
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...