थेट सरपंच निवडीच्या निर्णयाबाबत लवकर बैठक घेऊ : शरद पवार

Let's have a quick meeting on the direct sarpanch selection decision: Sharad Pawar
Let's have a quick meeting on the direct sarpanch selection decision: Sharad Pawar

सोलापूर : राज्यात होणारी सरपंच निवडणूक थेट जनतेतून घेतली जाते, मात्र हा निर्णय बदलून पुन्हा तो सदस्यातून घेण्याचा निर्णय सरकारने चालविला आहे, मात्र सरपंच परिषदेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय चुकीचा असून, या निर्णयात बदल करावा, हा निर्णय घेऊ नये, अशी मागणी सरपंच महापरिषदेच्या शिष्टमंडळाने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केली आहे. 

सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्यासह राज्य उपाध्यक्ष अनिल गीते, राज्य सरचिटणीस ॲड. विकास जाधव, राज्य समन्वयक अविनाश आव्हाड, जितेंद्र भोसले, राजीव पोतनीस, माउली वायाळ यांच्यासह राज्यातील पन्नास वेगवेगळ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन हा निर्णय थांबवण्याची विनंती केली. त्यावर पवार यांनी थेट सरपंच निवडीचा प्रश्न समजून घेऊन ग्रामविकास खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आपण ग्रामविकास मंत्र्यासोबत सरपंच परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करू, असे आश्वासन दिले. 

सरपंच परिषदेच्या सर्व पदाधिकारी यांचेशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले. सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनाही थेट जनतेतुन सरपंच हा निर्णय बदलू नये, अशी विनंती करणारे निवेदन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com