Agriculture news in Marathi, Let's kill the neem and finish the pink-ballworm | Agrowon

चला मारू निंबोळी अन् मारूया बोंड अळी; कृषी सहायकाकडून माहिती विस्तार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

अमरावती ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी व्यापक जागृती केली जात आहे. यामध्ये खारीचा वाटा उचलत अचलपूर तालुक्‍यातील एका कृषी सहायकाने स्वतःच गाणी रचत, ती गात, रेकॉर्डिंग करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये प्रचार, प्रसारासाठी पुढाकार घेतला आहे. सुधाकर पाटील, असे या कृषी सहायकाचे नाव असून, त्यांच्या या उपक्रमाशीलतेची दखल घेत जिल्हास्तरावर त्यांचा नुकताच गौरवही करण्यात आला.

अमरावती ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी व्यापक जागृती केली जात आहे. यामध्ये खारीचा वाटा उचलत अचलपूर तालुक्‍यातील एका कृषी सहायकाने स्वतःच गाणी रचत, ती गात, रेकॉर्डिंग करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये प्रचार, प्रसारासाठी पुढाकार घेतला आहे. सुधाकर पाटील, असे या कृषी सहायकाचे नाव असून, त्यांच्या या उपक्रमाशीलतेची दखल घेत जिल्हास्तरावर त्यांचा नुकताच गौरवही करण्यात आला.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कापसावर या वर्षी काही प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्याची तातडीने दखल घेत कृषी विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे. यवतमाळ, अकोला तसेच अमरावती जिल्ह्यात नुकसान पातळीच्या खाली बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. मात्र त्याची तीव्रता वाढू नये याकरीता कृषी विभागाने निंबोळीअर्क फवारण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केला. त्याला शेतकऱ्यांमधूनही प्रतिसाद मिळाला. अचलपूरचे कृषी सहायक सुधाकर पाटील यांनी या मोहिमेत जपलेले वेगळेपण निश्‍चितच कौतुकास्पद ठरत आहे. दुचाकीवर साउंड सिस्टीम, बॅनर बांधून त्यांनी हे काम चालविले आहे. त्यांच्या या जागृतीविषयक वेगळेपणाची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी नुकताच त्यांचा गौरव केला. 

माळ्याच्या माळ्यामदी कोण गं उभी!
अचलपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक सुधाकर पाटील यांनी बोंड अळी निवारण मोहीम हटके राबविली आहे. स्वमालकीच्या दुचाकीवर त्यांनी त्याकरिता खास साउंड सिस्टीम बांधली असून, त्यावर गाण्यांच्या माध्यमातून ते बोंड अळी निवारण पद्धती विषयी सांगतात. ‘माळ्याच्या मळ्यामदी कोण गं उभी, राखण करते मी रावजी...रावजी चला मारू निंबोळी अन् मारुया बोंड अळी’ अशा चित्रपट गाण्याच्या चालीवर गाणी रचत त्यांनी बोंड अळी निर्मूलन मोहिमेत आपले योगदान दिले आहे. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा देखील वाढता प्रतिसाद मिळत आहे.

इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...