agriculture news in marathi Let's raise the issue of diverting Ujani water to the Governor: Padalkar | Page 2 ||| Agrowon

उजनीचे पाणी पळविण्याचा प्रश्न राज्यपालांपुढे मांडू : पडळकर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

सोलापूर ः ``उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्याला सांडपाणी या शब्दाची झालर देऊन इंदापूरला पाणी पळवण्याचा निर्णय झाला आहे.`` 

सोलापूर ः उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्याला सांडपाणी या शब्दाची झालर देऊन इंदापूरला पाणी पळवण्याचा निर्णय झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या या प्रश्नावर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची विनंती केली. या प्रश्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागू, असे आश्वासन त्यांनी दिले.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूर येथील प्रकल्पासाठी घेऊन जाण्याच्या निर्णयावर जिल्ह्यात असंतोष आहे. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या जुलमी निर्णयाविरोधात त्यांचा पुतळा उजनीत बुडवून, पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला. तर, १ मे रोजी वेगवेगळ्या संघटनांच्या नेत्यांनी उजनी जलाशयात जलसमाधी आंदोलन केले. त्यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र ऐनवेळी सोलापूर येथील नियोजन भवन येथील नियोजित बैठक रद्द केली. आता लवकरच पुण्यात ही बैठक होत आहे. 

या पार्श्वभूमीवर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने पडळकर यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, उपाध्यक्ष अॅड. बापूसाहेब मेटकरी, सहसचिव किरण भांगे, सदस्य धनाजी गडदे, विठ्ठल मस्के यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


इतर बातम्या
सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने...
कृषी परिषदेत संचालक नेमण्यासाठी मुहूर्त...पुणे ः राज्याच्या कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी...
कोकणात जोरदार पाऊसपुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच...
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
‘एफआरपी’चा अभ्यास सुरू पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या...
‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून...पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग...
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत...अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...