नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
बातम्या
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु : आठवले
सोलापूर : ‘प्रशासनाने नुकसान ग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करावेत, केंद्र शासनाच्या मदतीसाठी आपण प्रयत्न करु’’, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (ता.२२) पंढरपुरात दिले.
सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या नुकसानी बरोबरोच घरांची पडझड झाली आहे. प्रशासनाने नुकसान ग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करावेत, केंद्र शासनाच्या मदतीसाठी आपण प्रयत्न करु’’, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (ता.२२) पंढरपुरात दिले.
अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग भीमा सोडण्यात आला होता. या नदी काठी पूरपस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या पाहणीसाठी आठवले पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटावरील कोसळलेल्या संरक्षित भिंतींची पाहणी मंत्री आठवले यांनी केली.
कुंभारघाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे मरण पावलेल्या अभंगराव कुंटुबियांच्या नातेवाईकांचीही भेट घेतली.
आठवले म्हणाले, ‘‘हे संकट मोठे आहे. त्यातून आपल्याला बाहेर यावे लागेल. या आपत्तीत केंद्र सरकारची मदत अधिकाधिक कशी मिळेल, हे आपण पाहू. तुम्ही चिंता करु नका.’’ उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आदी उपस्थित होते.