‘भीमा'ची साखर विकून देणी देण्याचा प्रयत्न करू : प्रांताधिकारी ढोले

Let's try to sell 'Bhima' sugar and give pending FRP: Dhole
Let's try to sell 'Bhima' sugar and give pending FRP: Dhole

सोलापूर : प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यातील जनहित शेतकरी संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलनाला भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांची थकित एफआरपी, निवृत्त कामगारांची थकित अंतिम देयके, ऊस वाहतुकीचे भाडे व जकराया साखर कारखान्यातील थकित एफआरपीबाबत सविस्तर चर्चा केली. कारखान्याची साखर विकून आपण ही देणी देऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

प्रांताधिकारी ढोले म्हणाले, "जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आरआरसीच्या कायद्यानुसार शिखर बॅंकेच्या परवानगीने गोदामातील सील केलेली ४० ते ५० हजार क्‍विंटल साखर विकून किंवा कारखान्याची स्थावर-जंगम मालमत्ता व अन्य जमिनी जप्त करून, विक्री करून शेतकऱ्यांची थकित एफआरपी, निवृत्त कामगारांची थकित देयके, ऊस वाहतुकीचे भाडे देण्याचा प्रयत्न करू.'' 

भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून ढोले यांनी कारखान्याची माहिती घेतली. या वेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, श्‍या‍मराव पाटील, नाना मोरे, सुभाष शेंडगे, सिद्धाराम वाघमोडे, महावीर भोसले, सुभाष वसेकर, बबन भोसले, भिवा आढेगावकर, गणेश काकडे, हरिभाऊ लोंढे, तानाजी मुळे, मारुती भांगे, बाबासाहेब ताड जिलानी, कल्याण भोसले, अरुण गावडे, अंगद वसेकर, अंकुश घुले, सुधाकर पवार, शिवाजी जाधव, सागर सलगर, अरुण सातपुते आदी उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, ‘‘प्रत्यक्ष कार्यवाही हवी. पुढील वर्षी कारखानदारांना गाळप परवाना देताना कर्ज, शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे कसे देणार, याची पुराव्यासह माहिती घेऊन गाळप परवाना द्यावा.``

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com