agriculture news in Marathi licence of 11 soybean seed companies Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने रद्द

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन बियाणे पुरवणाऱ्या ११ बियाणे कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यामुळे बियाणे उद्योगात खळबळ उडाली आहे.

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन बियाणे पुरवणाऱ्या ११ बियाणे कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यामुळे बियाणे उद्योगात खळबळ उडाली आहे.

कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या मान्यतेनंतर निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांनी परवाने रद्द केले आहेत. बहुतेक कंपन्या परराज्यातील आहेत. रवी सीड्स कॉर्पोरेशन (गांधीनगर), गुजरात बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स लिमिटेड व ॲग्रीस्टार जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड (साबरकांठा) या तीन कंपन्या गुजरातमधील आहेत. तसेच, एशियन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड (इंदोर), बालाजी सीड्स ॲंड ॲग्रीटेक (खंडवा), बंसल सीड्स (खंडवा), मोहरा सीड्स (इंदोर), निलेश ॲग्रो सीड्स, सिद्धार्थ सीड्स कंपनी ( खंडवा), उत्तम  सीड्स (खंडवा) या सहा कंपन्या मध्य प्रदेशातील आहेत. मात्र, होरायझन ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्रातील आहे.

निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीनची उगवण न झाल्याच्या ६२ हजारहून जादा तक्रारी यंदा कृषी विभागाकडे आल्या होत्या. उच्च न्यायालयाने देखील स्वतःहून हस्तक्षेप करीत एक जनहित याचिका दाखल केली होती. त्याबाबत काही सूचना देखील दिल्या होत्या. राज्य शासनाने देखील गंभीर दखल घेत ५४ घटनांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल केले होते. दुसऱ्या बाजूला कृषी आयुक्तालयाने कंपन्यांना नोटिसा दिल्या. मात्र, नोटिसांनंतर सुरू झालेल्या सुनावण्यांचे निकाल बाहेर पडले नव्हते.

‘‘दोन दिवसांपूर्वीच पहिल्या टप्प्यातील सुनावण्यांचे निकाल जाहीर केले गेले आहेत. आम्ही ११ कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. इतर कंपन्यांच्या सुनावण्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे. चालू आठवड्यात तसेच पुढील आठवड्यात कायदेशीर सुनावण्या घेतल्या जातील,’’ अशी माहिती आयुक्तालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. काही कंपन्यांनी परवाने रद्द होण्याची कारवाई वाचवण्यासाठी वेळा मागवून घेतल्या आहेत. अनेक कंपन्यांकडून नामांकित वकील नियुक्त केले आहेत. कृषी विभागाच्या विरोधात कायदेशीर मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद होत केले जात आहेत. बियाणे उद्योगाने या कारवाईच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

४० कंपन्यांच्या सुनावण्या चालू
गुणनियंत्रण संचालकांना या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याचे कायदेशीर अधिकार आहेत. मात्र, त्यासाठी आत्तापर्यंत ११७ कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यातील ७७ कंपन्यांच्या सुनावण्यात घेण्यात आल्या आहेत. ४० कंपन्यांच्या सुनावण्यांची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात अजून काही कंपन्यांवर मोठी कारवाई होण्याची चिन्हे आहेत.

प्रतिक्रिया
कायदा आणि नियमानुसार काम न करणाऱ्या सर्व कंपन्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. आम्ही जवळपास ११७ कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. नियमभंग करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात तसेच अप्रमाणित बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कडक कारवाई करणाचे निर्देश गुणनियंत्रण संचालकांना देण्यात आले आहेत.
- धीरज कुमार, कृषी आयुक्त


इतर अॅग्रो विशेष
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...