परवाने वितरणाचा यवतमाळ पॅटर्न राज्यभर

परवाने वितरणाचा यवतमाळ पॅटर्न राज्यभर
परवाने वितरणाचा यवतमाळ पॅटर्न राज्यभर

यवतमाळ ः कृषी परवाने वितरणातील मध्यस्थांची साखळी दूर करीत खाबूगिरीला चाप लावण्यात यशस्वी ठरलेल्या यवतमाळ पॅटर्नला राज्यभर मान्यता मिळण्याच्या हालचालींना गती आली आहे. कृषी आयुक्‍तांनी गुणनियंत्रण विभागाला यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या परवाने वितरण प्रक्रियेची चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.  जिल्हा स्तरावरील कृषी वितरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने यवतमाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत व्हॉटसॲपच्या माध्यमातून परवाने देण्याची अनोखी पद्धती अमलात आणली गेली आहे. या संदर्भाने ‘ॲग्रोवन’मधून बुधवारी (ता. १८) वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर परवाने देण्याच्या या पद्धतीचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी राज्यभर करता येईल का, या संदर्भाने चाचपणी करण्याच्या सूचना कृषी आयुक्‍तांनी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.   कृषी आयुक्‍त सुहास दिवसे हे प्रशिक्षणामुळे बाहेर असून त्यांचा प्रभार शेखर गायकवाड यांच्याकडे आहे. त्यानंतरही त्यांनी या संदर्भाने दखल घेतल्याचे सांगितले जाते. राज्याच्या गुणनियंत्रण विभागाला त्या संदर्भाने सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडूनदेखील यवतमाळ कृषी विभागाकडून उचलण्यात आलेल्या या पावलाचे कौतुक करण्यात आले आहे. त्यामुळे यवतमाळ पॅटर्नची लवकरच राज्यभरात अंमलबजावणी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. दरम्यान या संदर्भाने कृषी आयुक्‍तांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com