जळगाव जिल्ह्यातील पाच रेशन दुकानांचे परवाने निलंबित 

License of five ration shops in Jalgaon district suspended
License of five ration shops in Jalgaon district suspended

जळगाव ः जिल्ह्यात रेशनकार्ड धारकांना साखर वाटप न करणे, पावती न देणे, रेकॉर्ड अद्ययावत न ठेवणे आदी कारणांवरून रावेर, यावल, चोपडा तालुक्‍यातील पाच दुकानांचे निलंबन तर एक रद्द करण्यात आले आहे. जिल्हापुरवठा ही धडक कारवाई केली आहे. 

रावेर, यावल, चोपडा तालुक्‍यात रेशनकार्ड धारकांना साखर मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हापुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यामुळे जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांनी या तालुक्‍यात रेशन दुकाने तपासणीची धडक मोहीम राबविली. त्यात वटार (ता. चोपडा) येथील शिवाजी पाटील यांच्या दुकानात तपासणी करता अनेक बाबींत अनियमितता आढळून आली, तक्रारींच्या अनुषंगानेही चौकशी करून हे दुकानच रद्द करण्यात आले. 

शिंगाडी (ता. रावेर) येथील महेंद्र बघाडे यांचे दुकान सहा महिने निलंबित केले. ऐनपूर येथील कल्पना रमेश महाजन यांचे रेशन दुकान तीन महिन्यांसाठी निलंबित केले. अजंदे येथील मगन पाटील यांचे दुकान, टाकरखेडा (ता. यावल) येथील लताबाई चौधरी यांचे रेशन दुकाने ३ महिन्यासाठी निलंबित केले आहे. 

रावेरच्या तहसीलदारांनी जर नियमितपणे रेशन दुकानांची तपासणी केली असती तर नागरिकांना वेळोवेळी धान्य, साखर मिळाली असती आणि पुरवठा अधिकाऱ्यांना धडक तपासणी मोहीम हाती घ्यावी लागली नसती, असे नागरिकांना वाटते. 

रेशन कार्डधारकांना साखरवाटप न करणे, धान्य विकल्याची पावती न देणे, पूर्ण धान्य न देणे, रेकॉर्ड अद्ययावत न ठेवणे, शिल्लक मालाचा साठा भरपूर प्रमाणात आढळणे. रावेर, यावल तालुक्‍यातील जी रेशन दुकाने निलंबित केली आहे. त्यांना ग्रामसेवक, तलाठी, पुरवठा निरीक्षक यांच्या उपस्थितीत साखरवाटप करायला सांगण्यात आले आहे. त्यांची एक समिती स्थापन करून साखरवाटपाचा अहवाल देण्यास सांगण्यात आला आहे.

धान्यवाटपा अगोदरच थम्ब रावेर तालुक्‍यात अनेक रेशन दुकानदार दुचाकीवर फिरून रेशनकार्ड धारकांचे धान्य, साखर वाटपापूर्वीच पॉज मशिनने ‘थम्ब’ घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जर धान्य, साखर वाटपापूर्वीच थम्ब रेशन कार्ड धारकांनी दिला याचा अर्थ त्याला धान्याचे वाटप झाले. मात्र, प्रत्यक्षात रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याचा प्रकार येथे झाला आहे. याबाबतही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com