agriculture news in Marathi license will be suspend and action will be taken if farmer ditch in input purchased Maharashtra | Agrowon

निविष्ठांमध्ये शेतकऱ्यांना फसविल्यास परवाने रद्द आणि गुन्हे दाखल होणार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

कोरोना आणि लॉकडाऊनच्या स्थितीत त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा खते, बियाणे, कीटकनाशकांच्या विक्रीत पिळवणूक करण्याचा प्रयत्न करू नये; तसे झाल्यास विक्रेत्यांचे परवाने रद्द करूच पण फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाईल.

पुणे : कोरोना आणि लॉकडाऊनच्या स्थितीत त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा खते, बियाणे, कीटकनाशकांच्या विक्रीत पिळवणूक करण्याचा प्रयत्न करू नये; तसे झाल्यास विक्रेत्यांचे परवाने रद्द करूच पण फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाईल, असा कडक इशारा कृषी आयुक्तांनी दिला आहे. 

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून आगामी खरिपातील पूर्वतयारीबाबत सतत आढावा घेतला जात आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कामे वाटून देण्यात आली असून ऑनलाईन कामकाजामार्फत आयुक्तांकडून घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे. राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी आणि सहसंचालकांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना बजावले आहे, ‘‘खरीप हंगाम जवळ येत आहे. त्यामुळे खते,बियाणे निविष्ठा योग्य त्या दरात उपलब्ध होण्यासाठी संबंधित निरीक्षकांना सूचना द्या. निविष्ठांच्या उपलब्धेत अडचणी येणार नाहीत किंवा जादा दराने विक्री, साठेबाजी होणार नाही याची काळजी घ्या. गैरप्रकार निदर्शनास आले तर निरीक्षकांनी तात्काळ कडक कारवाई करावी. यात परवान्यांचे निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाई करावी’’ 

‘अॅग्रोवन’शी बोलताना आयुक्तांनी, ‘‘यंदा आम्ही निविष्ठा उपलब्धता, गुणवत्ता व किमतीच्या बाबतीत गंभीर असल्याचे सांगून गैरप्रकार केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे ठरविले आहे,’’ असे स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाने बियाणे, खते, कीटकनाशकांच्या उत्पादकांनाही सूचना दिलेल्या आहेत. 

आयुक्तालयाकडून लक्ष 
निविष्ठांच्या उत्पादन, वितरण, विक्री आणि साठवणूक अशा संपूर्ण साखळीवर आयुक्तालयाकडून लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी गुणनियंत्रण संचालक विजयकुमार घावटे व मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर यांच्याकडून सतत निरीक्षकांना सूचना दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...