सोलापूर जिल्ह्यातील एकवीस कृषी विक्रेत्यांचे परवाने निलंबित

सोलापूर : खताचा अतिरिक्त साठा ठेवणे, खत विक्रीत त्रुटी, यासारख्या विविध कारणांमुळे जिल्ह्यातील २१ कृषी विक्रेत्यांचे परवाने महिनाभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
Licenses of 21 agricultural vendors in Solapur district suspended
Licenses of 21 agricultural vendors in Solapur district suspended

सोलापूर : खताचा अतिरिक्त साठा ठेवणे, खत विक्रीत त्रुटी, यासारख्या विविध कारणांमुळे जिल्ह्यातील २१ कृषी विक्रेत्यांचे परवाने महिनाभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत. तर, अन्य १५ विक्रेत्यांना जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे.

युरियाची विक्री पॉस मशिनद्वारे करणे बंधनकारक आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी कोरोनाचे कारण वा शेतकरी आधार कार्ड आणत नाहीत, असे कारण देऊन पॉस मशिनवर ते नोंदवले जात नव्हते. अनेक शेतकऱ्यांना दिलेला युरिया एकाच शेतकऱ्यांच्या नावावर दाखवण्याचा प्रकार निदर्शनास आला. 

याबाबत तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार कृषी विभागाने ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यातील खत विक्रेत्यांकडील युरिया खरेदी केलेल्या सर्व कृषी केंद्रांची तपासणी केली. त्यानंतर दोषी आढळलेल्या २१ दुकानांचे परवाने एका महिन्यासाठी निलंबित, तर १५ दुकानांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

या विक्रेत्यांवर कारवाई

पंढरपूर तालुक्यातील इंडिया कृषी केंद्र, सोहम कृषी केंद्र, पांडुरंग कृषी सेवा केंद्र, कट्टे ट्रेडिंग कंपनी, आपला ग्रोमर सेंटर, विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र, गुरुदत्त कृषी उद्योग समूह, माढा तालुक्यातील शिवराज कृषी केंद्र, माळशिरस तालुक्यातील रणजित कृषी सेवा केंद्र, विशाल कृषी सेवा केंद्र, नेमचंद फुलचंद कडे कृषी सेवा केंद्र, पिलीव विकास कार्यकारी सोसायटीचे कृषी सेवा केंद्र, शेतकरी कृषी सेवा केंद्र, महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, धायगुडे अॅग्रो एजन्सी, मंगळवेढा तालुक्यातील समृद्धी कृषी केंद्र, कट्टे अॅग्रो एजन्सी, श्री महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, उत्तर सोलापूर तालुक्यातील वैशाली कृषी केंद्र, करमाळा तालुक्यातील एस. डी. दाभोडा कृषी सेवा केंद्र, दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्रीगणेश कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे. 

कृषी विक्रेत्यांनी खतविक्री करताना नियमानुसारच विक्री केली पाहिजे. खतासाठी अतिरिक्त पैसे घेणे वा साठा करणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांनीही खतखरेदीसाठी आधारकार्ड सोबत नेऊनच ते खरेदी करावे. यापुढेही तपासणी मोहीम अशीच सुरु राहील.  - रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com