agriculture news in marathi, The licenses of six agricultural services centers in Nanded are suspended | Agrowon

नांदेडमधील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नांदेड ः परराज्यातून, तसेच अन्य जिल्ह्यातून कीटकनाशकांची खरेदी उगम प्रमाणपत्राशिवाय केल्याचे आढळून आल्यामुळे नांदेड येथील सहा कृषी सेवा केंद्रांचे कीटकनाशके विक्री परवाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी मंगळवारी (ता. २१) निलंबित केले आहेत. तपासणी मोहिमेदरम्यान आढळलेला एकूण ८५ लाख रुपये किमतीचा परराज्यांतील कीटकनाशकांचा साठा विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

नांदेड ः परराज्यातून, तसेच अन्य जिल्ह्यातून कीटकनाशकांची खरेदी उगम प्रमाणपत्राशिवाय केल्याचे आढळून आल्यामुळे नांदेड येथील सहा कृषी सेवा केंद्रांचे कीटकनाशके विक्री परवाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी मंगळवारी (ता. २१) निलंबित केले आहेत. तपासणी मोहिमेदरम्यान आढळलेला एकूण ८५ लाख रुपये किमतीचा परराज्यांतील कीटकनाशकांचा साठा विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह आणि विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी दिलेल्या निर्देशानुसार बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शेतकऱ्यांना बोंडअळीच्या नियंत्रणासाठी दर्जेदार कीटकनाशके किफायतशीर किमतीमध्ये मिळवीत या उद्देशाने सर्व गुणवत्ता निरीक्षकांना कृषी निविष्ठा केंद्रांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले होते.

त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय तसेच जिल्हा गुणवत्ता निरीक्षक नितीन देशपांडे, मोहीम अधिकारी अनिल शिरफुले, डी. के. जाधव यांच्या पथकाने कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी केली असता नांदेड येथील सहा कृषी सेवा केंद्रांवर परराज्यांतून तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांतून उगम प्रमाणपत्राशिवाय आणण्यात आलेल्या कीटकनाशकांचा साठा असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी नांदेड येथील नवा मोंढा भागातील मोदी अॅग्री जेनेटीक्स, शिवम एजन्सी, सिद्धिविनायक अॅग्रो एजन्सी, सचिन सीडस कंपनी, व्यंकटेश्वरा अॅग्रो एजन्सीज, साई सीडस अॅण्ड पेस्टीसाईडस यांनी परवान्यामध्ये समाविष्ट न करता खरेदी केल्याचे आढळून आले आहे.

इतर बातम्या
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
जळगाव : किसान सन्मान निधीपासून ७०...जळगाव : केंद्राच्या शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या...
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...