Agriculture news in Marathi Licenses of six fertilizer sellers in Akola district revoked | Agrowon

अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे परवाने रद्द

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

कृषी विक्रेत्यांनी रासायनिक खत खरेदी-विक्रीचे विहित नमुन्यातील मासिक प्रगती अहवालही प्रशासनाकडे सादर केले नव्हते. याची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील १९ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची ओरड शेतकऱ्यांकडून झाली होती. कृषी खात्याला जनतेच्या रोषाला बळी पडावे लागले. आकडेवारीमध्ये जिल्ह्यात खत दिसायचे तर दुसरीकडे कृत्रिम टंचाई निर्माण झाली होती. त्यातच कृषी विक्रेत्यांनी रासायनिक खत खरेदी-विक्रीचे विहित नमुन्यातील मासिक प्रगती अहवालही प्रशासनाकडे सादर केले नव्हते. याची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील १९ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

सहा विक्रेत्यांचे परवाने रद्द तर १२ परवाने निलंबित करण्यात आले असून एकाला समज देण्यात आली आहे. या कारवाईने विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी जिल्ह्यातून जाता-जाता या धडक कारवाईचे आदेश बजावले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात या खरीप हंगामात रासायनिक कंपन्यांकडून पुरेसा खत पुरवठा झालेला असतानाही रासायनिक खत पुरवठ्याबाबत कृत्रिम टंचाई सदृश्‍य परिस्थिती तयार झाली होती. अनेकांना रांगा लावून खत घ्यावे लागले. काही ठिकाणी खत उपलब्ध असूनही विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना न देण्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या परिस्थितीमुळे शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींनी कृषी खात्याच्या कारभारावर रोष व्यक्त केला.

या अनुषंगाने कृषी विभागाने चौकशी करीत विक्रेत्यांना नोटीस बजावल्या. या नोटीसीला उत्तर मागण्यात आले होते. परंतु संबंधितांनी केलेला खुलासा वस्तुस्थिती धरून नव्हता. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे स्पष्टीकरण अमान्य
करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. वाघ यांनी सहा विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.

१२ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले तर एकाला समज देण्यात आली. परवाने रद्द केलेल्‍यात अकोल्यातील चार, तेल्हारा तालुक्यातील दोन विक्रेत्यांचा समावेश आहे. तर दोन महिन्यांसाठी परवाना निलंबित झालेल्या १२ विक्रेत्यांमध्ये अकोल्यातील सहा, तेल्हारा तालुक्यातील तीन, अकोटमधील तीन विक्रेते आहेत. तर अकोल्यातील एकाला ताकीद देण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...