Agriculture News in Marathi Licenses of two fertilizer dealers suspended | Agrowon

दोन खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

पॉस मशिन आणि गोदामातीळ प्रत्यक्ष साठा न जुळल्याने दोन खत विक्रेत्याचे विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

पुणे : पॉस मशिन आणि गोदामातीळ प्रत्यक्ष साठा न जुळल्याने दोन खत विक्रेत्याचे विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जुन्नर येथील कृषी अधिकारी यांच्यामार्फत विवेक (सावरगाव) आणि जय गुरूदेव अॅग्रो ट्रेडर (निमगाव) अशा दोन खत विक्रेत्यांची खत विक्री परवाना तपासणी दरम्यान युरिया खताचा पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्षात गोदामातील शिल्लक साठ्यामध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी संबंधित खत विक्री केंद्रावर परवाने निलंबित करण्याची कारवाई केली आहे.

 केंद्र शासनाने डीबीटी योजनेअंतर्गत अनुदानित खत विक्रीसाठी पॉस मशिनचा वापर अनिवार्य केला आहे. युरिया तसेच इतर अनुदानित खते ही पॉस मशिनमधून विक्री न झाल्यास ती मशिनवर शिल्लक दिसतात. यामुळे पुढील हंगामामध्ये केंद्र शासनाकडून मिळणारे खताचे आवंटन कमी होते. यासाठी हंगामामध्ये आवश्यक युरिया तसेच इतर अनुदानित खत मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत. या संदर्भात अधिनस्त गुणवत्ता नियंत्रण निरिक्षकांना सूचित केले आहे. तसेच मोहिम स्वरुपात अनुदानित खत विक्रेत्यांची तपासणी केली जाईल व ज्या विक्रेत्यांचा मशिनवरील साठा व प्रत्यक्षातील गोदामातील साठा जुळणार नाही त्यांचे विक्री परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

पॉस मशिनशिवाय विक्री नको
सर्व विक्रेत्यांनी विक्री केंद्राच्या दर्शनी भागात अनुदानित खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत आणण्याबाबतचे फलक लावावेत. कोणत्याही परिस्थितीत अनुदानित खतांची विक्री ही पॉस शिवाय होणार नाही, याची सर्व विक्रेत्यांनी नोंद घ्यावी. तसेच सर्व अनुदानित खत खरेदीला जाताना सोबत आधार कार्ड व खत विक्रेत्यांकडून खरेदी वेळी पॉस मशिनवरूनच खत विक्रीचा आग्रह करा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...