नांदेडमध्ये नैसर्गिक आपत्तीत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबांना मिळेना मदत

नांदेड : यंदाही आठ नागरिकांचा बळी या आपत्तीत गेला आहे. या नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून तातडीने मिळणारी मदत मागील काही महिन्यांपासून रखडली आहे.
 Life lost in a natural disaster in Nanded no Help for families
Life lost in a natural disaster in Nanded no Help for families

नांदेड  : जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात किंवा पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमध्ये नारिकासंह जनावरांना प्राण गमवावा लागतो. यंदाही आठ नागरिकांचा बळी या आपत्तीत गेला आहे. यात पुरात वाहून चार, तर वीज पडून चौघांना प्राणांना मुकावे लागले. यासोबतच ५० लहान-मोठी जनावरे दगावली आहेत. या नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून तातडीने मिळणारी मदत मागील काही महिन्यांपासून रखडली आहे. 

यंदा वीज पडून जूनमध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर, जुलैमध्ये दोघेजण दगावले. यात हरबळ तालुका कंधार येथील अर्चना हनुमंत गिरी, सुभाष दिगंबर गुंडेकर, (रा. सरसम बुद्रुक, तालुका हिमायतनगर), सुरेश जंगु कनाके (मांडवा, ता. किनवट) व उद्धव पांडुरंग तेलंग (रा. गौळ, ता. कंधार) या चौघांचा समावेश आहे.

यासोबतच पुरात वाहून चौघांना जीव गमवावा लागला. या दोघांचा जुलै महिन्यात, तर दोघांचा ऑगस्ट महिन्यात मृत्यू झाला. यात संतोष मारोतराव कदम (रा.धानोरा, ता. हदगाव), हनुमंत गोविंद गोरे (रा. हाणेगाव, ता.देगलूर), भागाजी परसराम जाधव (रा. वडगाव, ता. हिमायतनगर) व रामदास मलगाडा मलागर (रा. टाकळी, ता. देगलूर या चौघांचा समावेश आहे. 

या आठजणांपैकी तिघांना प्रत्येकी चार लाखाची मदत मिळाली. परंतु, पाच जणांना अद्याप मदत मिळाली नाही. यासोबतच नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचा मृत्यू झाला. यात मोठी दुधाळ जनावरे २८, लहान दुधाळ जनावरे तीन व काम करणारी मोठी जनावरे १९, तर लहान १२ अशा ५२ जनावरांचा समावेश आहे. या ५२ पैकी दोन प्रकरणे अपात्र ठरली. त्यामुळे ५० प्रकरणात कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com