Agriculture news in marathi life-threatening journey through the boat in Khedibhokri | Agrowon

खेडीभोकरीला बोटीतून होतोय जीवघेणा प्रवास

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

जळगाव : खेडीभोकरी (ता. चोपडा) ते भोकर (ता. जळगाव) या दरम्यान तापी नदीवर हंगामी लाकडी पूल टाकण्यात येत असतो. यंदा नदीत मोठे प्रवाही पाणी असल्याने हा पूल उभारलेला नाही. यामुळे नदी पार करण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागत आहे. खेडीभोकरी ते भोकरदरम्यान वाहतुकीसंबंधी तापी नदीवर मोठा पक्‍क्‍या स्वरूपातील पूल बांधण्यासंबंधीचे आश्‍वासन अनेकदा लोकप्रतिनिधींनी दिले, परंतु ही आश्‍वासने हवेत विरली आहेत. यात काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न देखील यामुळे निर्माण होत आहे. 

जळगाव : खेडीभोकरी (ता. चोपडा) ते भोकर (ता. जळगाव) या दरम्यान तापी नदीवर हंगामी लाकडी पूल टाकण्यात येत असतो. यंदा नदीत मोठे प्रवाही पाणी असल्याने हा पूल उभारलेला नाही. यामुळे नदी पार करण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागत आहे. खेडीभोकरी ते भोकरदरम्यान वाहतुकीसंबंधी तापी नदीवर मोठा पक्‍क्‍या स्वरूपातील पूल बांधण्यासंबंधीचे आश्‍वासन अनेकदा लोकप्रतिनिधींनी दिले, परंतु ही आश्‍वासने हवेत विरली आहेत. यात काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न देखील यामुळे निर्माण होत आहे. 

जळगाव तालुक्‍यातील भोकर आणि चोपडा तालुक्‍यांतील खेडीभोकरी या दोन गावांना जोडण्यासाठी तापी नदीवर ब्रिटिश काळात हंगामी लाकडी पूल टाकण्यात येत असतो. या पुलाचा वापर चोपडा, जळगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यांत जाण्यासाठी कमी अंतराचा व सोयीचा असतो. यामुळे पुलावरून होणारी रहदारी ही बरीच आहे. नदीला पाणी असल्याने पूल अजून टाकण्यास उशीर आहे. परंतु, नागरिकांना एका बाजूने नदीच्या दुसऱ्या काठावर सोडण्यासाठी चार बोटींची व्यवस्था येथे आहे. मात्र, या बोटींमधून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचा अनुभव येथून जाणाऱ्या प्रत्येकाला येत आहे. 

भोकर ते चोपडा हे अंतर फक्‍त पंधरा किलोमीटर आहे. मात्र, पूल बंद झाल्यास हे अंतर ७० किलोमीटरचे होते. परिणामी, वेळ व पैसा देखील खर्च होतो. शिवाय खेडीभोकरी, भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोरे, करंज, सावखेडा आदी गावांतील शेतकऱ्यांना ये- जा करण्यासाठी या पुलाचा मोठा फायदा होत असतो. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांनी याठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली आहे. येथील नागरिक अनेक वर्षांपासून याबाबत मागणी करत आहेत मात्र, याबाबत केवळ आश्‍वासन दिले जात असून प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कृती झालेली नाही. 

खेडीभोकरीच्या पायथ्याशी चार बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. मुळात बोटींमधून नागरिकांना एका काठावरून दुसऱ्या काठावर नेण्याचे काम करणे अपेक्षित असताना नागरिकांसोबत दुचाकी देखील ठेवल्या जात आहेत. एका कोटीवर आठ- दहा दुचाकी ठेवून नागरिकांना बसविले जाते. अर्थात बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त जण बसल्याने जानेवारीमध्ये धडगाव तालुक्‍यात नर्मदा प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्ये बोट उलटून पाच जणांचा मृत्यू झाला होता.

अशीच घटना पावसाळ्यात देखील घडली आहे. याचीच पुनर्रावृत्ती खेडीभोकरी येथे होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिक आणि दुचाकी अशा वाहतुकीत काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्‍न समोर येत आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...