राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
ताज्या घडामोडी
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसा
सांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी झाली. कृष्णा नदीकाठी पहिल्या पंपगृहात पंपांची संख्या २२ वर नेण्यात आली. आजवर कमाल २१ पंपच सुरू करण्यात आले होते. पाण्याचा उपसा वाढल्याने जत तालुक्यात २५० क्युसेक क्षमतेने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
तीव्र उन्हामुळे पाण्याची मागणी खूपच वाढली आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या झाल्यानेही पाण्याची गरज निर्माण झाली आहे. पैसे भरलेल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी लकडा लावल्याने यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे सर्व पंपगृहांतील पंपांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे.

पहिल्या पंपगृहात बावीस पंप एकाचवेळी सुरू केल्याने मुख्य कालवे दुथडीपर्यंत भरून वाहू लागले. पाण्याची गती वाढल्याने बनेवाडी, डोंगरवाडी ही पंपगृहे पूर्ण क्षमतेने सुरू झाली. बनेवाडी योजनेतून भोसेच्या पाझर तलावात पाणी सोडण्यात येत आहे. डोंगरवाडी योजनेतून सोनी परिसराला पुरवठा सुरू आहे. लिंगनूर कालव्यातून लिंगनूर, खटाव, संतोषवाडीला पाणीपुरवठा सुरू आहे.
- 1 of 579
- ››