कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा परिषदेचा ठराव

केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने भावावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांदा निर्यातबंदी त्वरित हटवावी, असा ठराव कृषी समितीच्या सभेत करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
Lift onion export ban; Resolution of Nagar Zilla Parishad
Lift onion export ban; Resolution of Nagar Zilla Parishad

नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने भावावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांदा निर्यातबंदी त्वरित हटवावी, असा ठराव कृषी समितीच्या सभेत करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.  

नगर जिल्हा परिषद कृषी समितीची मासिक आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. सभापती काशीनाथ दाते यांच्यासह समितीचे सदस्य बैठकीला हजर होते. बैठकीत कृषी योजनांचा आढावा घेऊन जास्तात जास्त शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ देण्याच्या सूचना देण्यात आल्या. केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यातबंदी त्वरित उठविण्याबाबतचा ठराव सभेत कार्ले यांनी मांडला. त्यास समितीने मंजुरी दिली. कोविडच्या प्रादुर्भावात रेल्वेस्टेशनवर युरियाची रेक आली असता, कोरोनाबाधित असतानाही ती उतरविण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यात युरियाच्या टंचाईला आळा बसला. या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन कण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाचा लाभ मंजूर लाभार्थींना १०० टक्के देण्याची जबाबदारी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांवर (कृषी) सोपविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com