Agriculture news in marathi, Lift restrictions on sale of arable land | Page 3 ||| Agrowon

जिरायत, बागायत जमीन विक्रीवरील निर्बंध उठवा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

नाशिक : ‘‘जिरायत व बागायत जमीन विक्रीवरील जाचक निर्बंध उठवावेत, अशी मागणी सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.

नाशिक : ‘‘शासनाच्या नव्या धोरणानुसार जमीन विक्रीसाठी काही जाचक निर्बंध लावण्यात आले आहेत. नवीन आदेशानुसार दोन एकर जिरायत व २० गुंठे बागायत जमिनीचे तुकडे करून जमीन विक्री करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत अडचणीचा आहे. खरेदी विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आदींमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ आणि लुटीला प्रोत्साहन मिळेल. ही अडचण लक्षात घेता जिरायत व बागायत जमीन विक्रीवरील जाचक निर्बंध  उठवावेत, अशी मागणी सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. 

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, माजी आमदार संजय चव्हाण, बागायतदार सोसायटीचे अध्यक्ष  माधव सोनवणे, सुभाष झालटे, विकास सोनवणे, सुनील खैरनार, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका

सद्या शेतकरी नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा, नापिकी तसेच गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी कुटुंबातील लग्न, सावकारी कर्ज, मुलांचे शिक्षण आदी कामात अडचणी येत आहेत. पर्यायी अडचण सोडवण्यासाठी शेतकरी शेतीची विक्री करतो. गरजेपोटी शेतीचा एखादा तुकडा विकून गरज भागणार असली, तरीही केवळ शासनाच्या या नवीन आदेशामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने जास्तीच्या शेतीची विक्री करावी लागेल. यामुळे शेतकरी भूमिहीन होण्याचा सुद्धा धोका आहे, असे निवेदनात नमूद आहे. 
 


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...