मराठवाड्यातील पाणीसाठ्यात थोडी वाढ

मराठवाड्यातील पाणीसाठ्यात थोडी वाढ
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात थोडी वाढ

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमध्ये काही अंशी वाढ झाली आहे. ८७२ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणी ९ ऑगस्ट अखेरपर्यंत २२.७९ टक्‍क्‍यांवर येऊन पोहोचले आहे. जायकवाडीत झालेल्या पाणीसाठ्यासह नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील काही प्रकल्पांमध्ये झालेल्या पाणीसाठ्याने उपयुक्‍त पाण्याचा टक्‍का सुधारण्यास मदत झाली आहे. 

मराठवाड्यातील एकूण ११ मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिद्धेश्‍वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना, सिनाकोळेगाव आदी प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा ७९ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पात १३ टक्‍के, निम्न मनारमध्ये २० टक्‍के, तर विष्णुपुरी प्रकल्पात १६ टक्‍के उपयुक्‍त पाण्याचा साठा झाला आहे.

७५ मध्यम प्रकल्पांमध्ये ६.२१ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला असून, लातूरमधील ८, उस्मानाबादमधील १७, परभणीमधील २ मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत २० टक्‍के, बीडमधील १६ प्रकल्पांत केवळ १ टक्‍का, जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पात २१ टक्‍के, तर औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ ७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे.

संख्येने सर्वाधिक असलेल्या ७४९ लघू प्रकल्पांमध्ये ५.२१ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत १० टक्‍के, जालन्यामधील ५७ प्रकल्पांत १ टक्‍का, बीडमधील १२६ प्रकल्पांत १ टक्‍का, उस्मानाबाद जिल्ह्यातील २०५ प्रकल्पांत १ टक्‍का, तर नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांत २५ टक्‍के, हिंगोलीमधील २६ लघू प्रकल्पांत २५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. तेरणा, मांजरा, रेणा बंधाऱ्यात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यात १३.६६ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com