Agriculture news in Marathi, Light to moderate rainfall in the district | Agrowon

सातारा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

सातारा ः जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा सर्वदूर पाऊस बुधवारी (ता. २५) झाला आहे. दुष्काळी तालुक्यात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी सकाळी आठपर्यंत सरासरी १५.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेली दोन दिवस मुसळधार पावसानंतर बुधवारी पावसाचा जोर ओसरला आहे. बहुतांशी ठिकाणी सायंकाळी व रात्री पावसाचा जोर वाढत आहे. बुधवारी रात्री माण, खटाव, फलटण या तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. हा पाऊस दुष्काळी तालुक्यातील रब्बी हंगामाच्या दुष्टीने फायदेशीर ठरणार आहे. तसेच पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. 

पश्‍चिम भागात पावासाचा जोर कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या दमदार पावसामुळे पिके पाण्यात आहे. तसेच अति पाण्यामुळे पिके पिवळी पडू लागली आहे. शेतातील पाण्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असल्याने धरणाचे सर्व दरवाजे बंद करून विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात एकूण १०४.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये
सातारा २४.६३, जावळी १६.१५, पाटण १४.८२, कराड १८.६९, कोरेगाव १३.००, खटाव १०.१२, माण ६.२९, फलटण ७.३३, खंडाळा १०.७०, वाई २१.८३, महाबळेश्‍वर २५.४०.

इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...