agriculture news in marathi, Light, moderate rainfall in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

औरंगाबाद : आकाशात ढगांची गर्दी होऊन पाऊस येण्याची स्थिती निर्माण होते. मात्र, प्रत्यक्षात पाऊस पडतच नसल्याने मराठवाड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे. गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील १४२ मंडळांत पावासाने हजेरी लावली. परंतु, अपवाद वगळता बहुतांश मंडळांत तुरळक ते हलक्‍या पावसाचीच नोंद झाली.  

औरंगाबाद : आकाशात ढगांची गर्दी होऊन पाऊस येण्याची स्थिती निर्माण होते. मात्र, प्रत्यक्षात पाऊस पडतच नसल्याने मराठवाड्यात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे. गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील १४२ मंडळांत पावासाने हजेरी लावली. परंतु, अपवाद वगळता बहुतांश मंडळांत तुरळक ते हलक्‍या पावसाचीच नोंद झाली.  

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी ४७ मंडळांत पाऊस झाला. औरंगाबादसह गंगापूर, सोयगाव तालुक्‍यांत पावसाचा जोर थोडा अधिक होता. औरंगाबाद मंडळात ३८ मिलिमीटर, उस्मानपुरा ३५, भावसिंगपुरा ४१, चित्तेपिंपळगाव २१, चौका १५, लाडसावंगी २०, करमाड २२, कांचनवाडी ३५, वरूडकाझी ११, तर चिकलठाणा मंडळात ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पैठण तालुक्‍यातील पैठण मंडळात २१ मिलिमीटर, बालानगर ११, पाचोड १८, आडूळ १०, लोहगाव १०, विहामांडवा ११, नांदर १४.५०, तर पिंपळगाव पी मंडळात १९ मिलिमीटर पाऊस झाला.  

सोयगाव तालुक्‍यातील सोयगाव मंडळात २०, तर बनोटीत १२ मिलिमीटर पाऊस झाला. वैजापूर मंडळात २२ मिलिमीटर, महालगाव ११, खंडाळा १२, लाडगाव १८, लासूरगाव १०, नागमठाण मंडळात १८ मिलिमीटर पाऊस झाला. गंगापूर तालुक्‍यातील गंगापूर मंडळात ५७ मिलिमीटर, वाळूज २५, मांजरी ५२, सिद्धनाथ वडगाव १६, हर्सूल १४, तुर्काबाद २७, भेनडाला १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कन्नड व खुलताबाद तालुक्‍यांतील चार मंडळांत तुरळक पाऊस वगळता पावसाने पाठच फिरविली. लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी केवळ एका मंडळात, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी केवळ १७ मंडळांत पाऊस झाला.

जिल्ह्यातील भूम तालुक्‍यातील लिट मंडळातील २३ मिलिमीटर, अंबी मंडळात १५, वाशी तालुक्‍यातील पारगाव मंडळात १५ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित मंडळात तुरळकच हजेरी लागली.


इतर अॅग्रो विशेष
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...