मराठवाड्यातील १८९ मंडळांत हलक्या सरी

मराठवाड्यातील १८९ मंडळांत हलक्या सरी
मराठवाड्यातील १८९ मंडळांत हलक्या सरी

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील १८९ मंडळांमध्ये मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद, पैठण, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, गंगापूर, वैजापूर, खुल्ताबाद तालुक्यामध्ये पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २० मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. जालना, भोकरदन, मंठा, अंबड, घनसावंगी तालुक्यात पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २५ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. परभणी, पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, सेलू, जिंतूर, पाथरी, मानवत तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली.

हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी सेनगाव आणि औंढा नागनाथ तालुक्यातील २ मंडळांत सरी कोसळल्या. नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ३७ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, लोहा, किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, नायगावसह मुखेड तालुक्यातील मंडळांचा त्यात समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी १३ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. लातूर, औसा, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, निलंगा तालुक्यातील मंडळांचा त्यात समावेश आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी १३ मंडळांमध्ये पाऊस झाला. उस्मानाबाद, तूळजापूर, भूम, वाशी तालुक्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २५ मंडळांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, शिरूर कासार, वडवणी, माजलगाव, धारुर, परळीत पावसाची नोंद झाली. 

मंडळनिहाय पाऊस (मिमी) ः 

औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद ११, उस्मानपुरा १९, भावसिंगपुरा १५, चितेपिंपळगाव १२, करमाड १२, कांचनवाडी १२, चिकलठाणा ८, पैठण ५, बिडकीन १९, बालानगर ४,पाचोड ४, आडूळ १३, लोहगाव १४, विहामांडवा ७, ढोरकीन १२, अजिंठा १६, अंबाई १९, अमठाणा ५, गोळेगाव १६, बोरगाव बाजार ६, सोयगाव २४, बनोटी २६, सावलदबारा ११, वैजापूर २६, शिवूर १८, खंडाळा १६, महालगाव २२, लाडगाव २०, लासुरगाव ३०, गारज २१, नागमठाण १३, लोणी ५, बोरसर २८, गंगापूर १६, वाळूज १७, शेंदरवादा ५, मांजरी १३, सिद्धवडगाव २६, हर्सुल २९, तुर्काबाद ३२, डोणगाव १०, भेंडाळा ११, चिकलठाणा ६, देवगाव रंगारी २०, वेरुळ १०, सुलतानपूर ८, बाजारसावंगी ५.
जालना जिल्हा जालना ग्रामीण ५, नेर ६, वाग्रूळ जहांगीर १०, धावडा ४८, पिंपळगाव रेणुकाई ९, अनवा १५, अंबड ८, धनगरपिंपरी १२, जामखेड ९, वडीगोद्री १०, रोहिलगड १६,तीर्थपुरी ६, जांब समर्थ ७.
परभणी जिल्हा परभणी ५, झरी ७, आडगाव ७, मानवत ८,कोल्हा १५, हदगाव ८, सोनपेठ ५, आवलगाव १३, गंगाखेड ६, राणीसावगाव ७, माखणी ७, महातपुरी ५,चाटोरी ९,चुडावा ७, कात्नेश्वर ५.
हिंगोली जिल्हा

गोरेगाव ४, औंढा नागनाथ १. 

नांदेड जिल्हा नांदेड २, नांदेड ग्रामीण ३, वजीराबाद ३, तरोडा ४, अर्धापूर ४, दाभड ५, बारड ७, मनाठा ५, दहेली ७, माहूर १०, वाई ४, सिंदखेड ४, जवळगाव ४, मोगाळी ५, मातुल ४, सिंधी १०, नरसी ६, लोहगाव ७, खानापूर ६, मुखेड ४, जांब १०, चांडोळा ४.
लातूर जिल्हा रेणापूर ५, शिरूर ताजबंद ६, अंधोरी ५, वडवळ नागनाथ ५, घोन्सी ५.
उस्मानाबाद जिल्हा तेर ५, ढोकी ३, जागजी ३, तुळजापूर ४, अशू ५.
बीड जिल्हा बीड ७, पेंडगाव ४, पाली ४, अमळनेर ८, धामणगाव ५, दौलावडगाव ६, पिंपळा ४, गेवराई १२, धोंडराई १२, उमापूर ७, चकलांबा ७, जातेगाव १२, तलवाडा ५, सिरसदेवी ५,तिंतरवणी ८, परळी ६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com