agriculture news in marathi, Light rain in Aurangabad district | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जुलै 2019

औरंगाबाद : जिल्ह्यातील १६ मंडळांत गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाची हजेरी लागली. सिद्धनाथ वडगाव मंडळातील ४२ मिलिमीटर पावसाची नोंद वगळता इतर मंडळांत तुरळक, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

औरंगाबाद तालुक्यांतर्गत येत असलेल्या करमाड मंडळात १४ मिलिमीटर, वैजापूर तालुक्‍यातील वैजापूर मंडळात १९, शिवूर १७, तर लासूरगाव मंडळात १९ मिलिमीटर इतका पाऊस झाला. उर्वरित मंडळात १ ते १० मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. सिद्धनाथ वडगाव मंडळात सर्वाधिक ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याच मंडळातील काही गावशिवारात सडा पडल्यागत पाऊस झाला. 

औरंगाबाद : जिल्ह्यातील १६ मंडळांत गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाची हजेरी लागली. सिद्धनाथ वडगाव मंडळातील ४२ मिलिमीटर पावसाची नोंद वगळता इतर मंडळांत तुरळक, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

औरंगाबाद तालुक्यांतर्गत येत असलेल्या करमाड मंडळात १४ मिलिमीटर, वैजापूर तालुक्‍यातील वैजापूर मंडळात १९, शिवूर १७, तर लासूरगाव मंडळात १९ मिलिमीटर इतका पाऊस झाला. उर्वरित मंडळात १ ते १० मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. सिद्धनाथ वडगाव मंडळात सर्वाधिक ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याच मंडळातील काही गावशिवारात सडा पडल्यागत पाऊस झाला. 

शेकटा गाव शिवारात ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वजनापूर व शेकटा गावशिवारातील आठ बंधाऱ्यांपैकी एकाच बंधाऱ्याला पाणी आले. त्यामुळे इतर बंधाऱ्यांच्या शिवारात पावसाचे प्रमाण कमी होते, हे स्पष्ट होते. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील मोजक्‍या मंडळांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

ढग इकडे... विमान तिकडे...

ढग येतात पण पाऊस पडत नाही. अशा स्थितीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यासाठी शासन तयार असल्याचे सांगितले गेले. त्यात तारखाही समोर आल्या. परंतु प्रत्यक्षात पावसाची वाट पाहणेच उचित समजल्याचे चित्र आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सोलापूर विमानतळावर विमान उतरले; पण तिकडे ढगच नाहीत. दुसरीकडे औरंगाबादसह मराठवाड्यातील काही भागांत अधूनमधून ढग दिसत आहेत. तरीही इकडे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीची तयारी नाही. गुरुवारी (ता. २५) औरंगाबाद शहराच्या कक्षेत आकाशात ढगांची गर्दी होती. दुसरीकडे परभणीतही ढग दिसले. परंतु पावसाची वाट पाहण्याशिवाय सध्यातरी पर्याय दिसत नाही.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...